ओव्हरटेक केलं, यू-टर्न घेतला
पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर अकिलने खुलासा केला आहे. 30 वर्षीय अकील खान सकाळी त्याच्या वडिलांना सत्या साई स्क्वेअर येथे सोडण्यासाठी गेला होता. परत येत असताना त्याने खेळाडूंना रोबोट स्क्वेअरकडून खजरानाकडे पायी जाताना पाहिले. अकीलने त्यांना ओव्हरटेक केलं. त्यानंतर त्याने यू-टर्न घेतला, पुन्हा त्यांच्या जवळ गेला आणि कथित गैरवर्तन करून नोंदणी नसलेल्या मोटरसायकलवरून पळून गेला. पोलिसांनी तांत्रिक पाळत आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा माग काढला आणि त्याला अटक केली होती. त्यावर DCP यांनी मोठा खुलासा केला आहे.
advertisement
विनयभंग केल्याची कबुली
अतिरिक्त DCP राजेश दंडोतिया यांनी सांगितलं की, सुरुवातीला अकील फक्त सेल्फी काढायची आहे, असं सांगत होता, परंतु नंतर त्याने खेळाडूंचा पाठलाग करून त्यांना विनयभंग केल्याची कबुली दिली. अकीलला रविवारी कोर्टात हजर करण्यात आले आणि त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
इंदूरमध्ये कॅफेकडे जाताना...
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेची पुष्टी करताना स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, "दोन ऑस्ट्रेलियन महिला टीमच्या सदस्यांना इंदूरमध्ये कॅफेकडे जाताना एका टुव्हिल चालक त्यांच्याकडे आला आणि अयोग्यरित्या स्पर्श केला याची क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुष्टी करत आहे. टीमच्या सिक्युरिटीने ही मॅटर पोलिसांना कळवली आहे आणि ते पुढील तपास करत आहेत.”
