स्मिथचा रन घेण्यास स्पष्ट नकार
सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यातील मॅचमध्ये पाकिस्तानचा माजी कॅप्टन बाबर आझम याला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. सिडनी सिक्सर्सकडून खेळताना बाबरने ३८ बॉलमध्ये ४७ रन्स केले होते. ११ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाबरला सिंगल घेऊन आपली स्ट्राईक टिकवायची होती, मात्र नॉन-स्ट्रायकर एंडला असलेल्या कॅप्टन स्टीव्ह स्मिथने त्याला रन घेण्यास स्पष्ट नकार दिला. बाबरची संथ बॅटिंग पाहून स्मिथने घेतलेल्या या निर्णयामुळे बाबर कमालीचा नाराज दिसला.
advertisement
बाबर स्ट्राईकवर आला, तेव्हा...
पुढच्याच ओव्हरमध्ये स्टीव्ह स्मिथने आपल्या निर्णयाचे समर्थन करत रियान हेडलेच्या बॉलवर सलग ४ सिक्स आणि १ फोर मारून ३२ रन्स कुटले. मात्र, जेव्हा १३ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर बाबर स्ट्राईकवर आला, तेव्हा तो नॅथन मॅकएंट्रूकडून बोल्ड झाला. केवळ ३ रन्सने आपले अर्धशतक हुकल्यामुळे संतापलेल्या बाबरने मैदानाबाहेर जाताना बाउंड्री लाईनवर रागाने बॅट आपटली. ही मॅच अखेर सिडनी सिक्सर्सने ५ गडी राखून जिंकली, ज्यात स्मिथने ४२ बॉलमध्ये १०० रन्सची तुफानी इनिंग खेळली.
आठवड्यातील दुसरी वेळ
पाकिस्तानी खेळाडूंचा अशा प्रकारे अपमान होण्याची ही आठवड्यातील दुसरी वेळ आहे. १२ जानेवारी रोजी मोहम्मद रिझवानला देखील मेलबर्न रेनेगेड्सचा कॅप्टन विल सदरलँड याने संथ बॅटिंगमुळे चक्क मैदानाबाहेर बोलावले (Retired Out) होते. बीबीएलच्या इतिहासात रिटायर्ड आउट होणारा रिझवान हा पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये वेगाने रन्स बनवण्याचा दबाव आता दिग्गज खेळाडूंवरही कशा प्रकारे येतोय, हेच या घटनांवरून स्पष्ट होत आहे.
