खरं तर सेमी फानयल सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने धुंवाधार सुरूवात केली होती. वैभवने पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा कुटल्या होत्या. त्यानंतर देखील त्याने वादळी खेळी सूरू ठेवली.शेवटी वैभव सूर्यवंशी 15 बॉलमध्ये 38 धावांची खेळी करून बाद झाला.या दरम्यान वैभव सूर्यवंशीने 4 षटकार आणि 2 चौकार लगावले होते. वैभवनंतर नमन धीर 7 वर बाद झाला होता.
advertisement
त्यानंतर प्रियांश आर्याने भारताचा डाव सावरला होता. प्रियांश आर्याने 23 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली होती. या दरम्यान त्याने 3 षटकार आणि 4 चौकार मारले होते.त्यानंतर जितेश शर्माने 33 धावांवर बाद झाला होता.
त्यानंतर अखेरच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १७ धावांची गरज होती. भारताने पहिल्या ५ चेंडूत १३ धावा केल्या अ्न अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना टीम इंडियाने ३ धावा केल्या आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली होती.
बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करताना 194 धावा काढल्या होत्या. बांग्लादेशकडून हबीबूर रहमानने 65 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. त्याच्यासोबत एसएम मेहरोबने 18 बॉलमध्ये 48 धावांची खेळी केली होती. या बळावरच बांग्लादेशने 6 विकेट गमावून 194 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून गुरजनप्रीत सिंहने 2 , हर्ष दुबे, सूयश शर्मा, रमणदिप सिंह आणि नमन धीरने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
बांग्लादेशचा अ संघ : हबीबुर रहमान सोहन, जिशान आलम,झवाद अबरार,अकबर अली (कर्णधार/विकेटकिपर), महिदुल इस्लाम अंकन, यासिर अली,एस एम मेहेरोब,अबू हैदर रोनी,रकीबुल हसन,अब्दुल गफ्फार सकलेन,रिपन मंडोल
भारताचा अ संघ : प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी,नमन धीर,नेहल वढेरा,जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), हर्ष दुबे,आशुतोष शर्मा,रमणदीप सिंग,विजयकुमार वैशाक,गुरजपनीत सिंग,सुयश शर्मा
