Success Story : टाकाऊ पासून टिकाऊ, प्रदीप यांनी उभारला गीगांटीक्स डेकोर व्यवसाय, वर्षाला 2 कोटींची उलाढाल, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
टाकाऊ आणि निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या ड्रम, गाड्या, सायकल्स, टायर आदी वस्तूंना नव रूप देऊन ते त्यापासून फर्निचर, सेल्फी पॉइंट्स, फूड स्टॉल्स अशा आकर्षक वस्तू तयार करतात.
पुणे: आयुष्यात स्वतःचं काही तरी करायचं या जिद्दीच्या जोरावर धुळे जिल्ह्यातील एका छोट्या गावातून पुण्यात आलेल्या प्रदीप जाधव यांनी गीगांटीक्स डेकोर हा व्यवसाय वाघोली येथे सुरू केला. टाकाऊ आणि निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या ड्रम, गाड्या, सायकल्स, टायर आदी वस्तूंना नवं रूप देऊन ते त्यापासून फर्निचर, सेल्फी पॉइंट्स, फूड स्टॉल्स अशा आकर्षक वस्तू तयार करतात. त्यांनी बनवलेल्या प्रॉडक्ट्ला भारतभर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यातून त्यांची वर्षाला तब्बल 2 कोटींची उलाढाल होते. त्यांच्या या व्यवसायाबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
टाकाऊ पासून टिकाऊ..
मूळचे धुळ्याचे असणारे प्रदीप जाधव हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. चांगल्या कंपनीत लाखभर पगाराची नोकरी करत होते. मात्र स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभा करायचा हा ध्यास घेत त्यांनी 2020 साली गीगांटीक्स डेकोर हा व्यवसाय सुरू केला.
advertisement
व्यवसाय सुरू केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत कोरोनामुळे लॉकडाऊन पडले आणि नुकताच सुरू झालेला व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. परंतु प्रदीप यांनी हार मानली नाही. त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं. आज त्यांचे 2,000 हून अधिक प्रॉडक्ट्स भारतभर एक्सपोर्ट होतात.
आज गीगांटीक्स डेकोरमध्ये फर्निचर, सेल्फी पॉइंट्स, फूड स्टॉल्स आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात. निसर्गाचं संवर्धन लक्षात ठेवून रिसायकल मटेरियलचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही झाली आहे. त्यांच्या या व्यवसायातून वर्षाला तब्बल 2 कोटीची उलाढाल होते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 21, 2025 7:08 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : टाकाऊ पासून टिकाऊ, प्रदीप यांनी उभारला गीगांटीक्स डेकोर व्यवसाय, वर्षाला 2 कोटींची उलाढाल, Video

