स्कोर 190 पर्यंत जाईल असे वाटत होते, पण...
लिटन दास म्हणाला, “आशिया कपच्या आधी आम्ही काही सिरीज खेळल्या आणि आम्ही चांगली बॅटिंग केली. आम्ही सहज चेस करू शकलो. मुस्तफिजुर किती धोकादायक गोलंदाज आहे हे सर्वांना माहीत आहे. ही विकेट बॅटिंगसाठी चांगली होती. मुस्तफिजुरने टाकलेली 19 वी ओव्हर आणि तस्किनची 20 वी ओव्हर यामुळे मॅच पूर्णपणे बदलली. स्कोर 190 पर्यंत जाईल असे वाटत होते, पण त्यांनी त्याला कमी स्कोरवर रोखले. तस्किनने शेवटची ओव्हर खूप चांगली टाकली.”
advertisement
सैफ बांगलादेशला मॅच जिंकवून देऊ शकतो
सैफने केलेल्या बॅटिंगबद्दल बोलताना दास म्हणाला, “मला माहीत आहे की सैफ बांगलादेशला मॅच जिंकवून देऊ शकतो. तो UAE मध्ये चांगली कामगिरी करेल हे आम्हाला माहीत होतं. मला त्याचा स्वभाव आणि तो धावा कशा करतो हे माहीत आहे. अशाप्रकारे मॅच जिंकल्यावर पुढच्या मॅचसाठी एक वेगळीच ऊर्जा मिळते, पण आम्हाला पुन्हा नव्या दिवसाची, नव्या टीमची आणि नव्या मॅचची तयारी करावी लागेल.”
बांगलादेशचा 1 बॉल राखून विजय
दरम्यान, 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. त्यांचा एक खेळाडू लवकर आऊट झाला. मात्र, त्यानंतर सैफ हसन आणि लिटन दास यांनी 59 धावांची भागीदारी करून मॅच बांगलादेशच्या बाजूने आणली. त्यानंतर तौहीद हृदोयने 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचमध्ये नाट्यमय वळण आले, पण बांगलादेशने 1 बॉल राखून विजय मिळवला.