बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कॅमेऱ्यात 'नो एन्ट्री'
एका प्रसिद्ध संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, मॅचमध्ये भारताचा विजय निश्चित झाल्यावरच बीसीसीआयचा एखादा पदाधिकारी कॅमेऱ्यासमोर येण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'पाकिस्तानसोबत खेळण्याची परवानगी सरकारकडून मिळाल्यावरच आम्ही मॅचसाठी तयारी दर्शवली. पण तरीही देशात या मॅचला विरोध होत आहे. अशा वेळी मॅच सुरू असताना कॅमेऱ्यासमोर आल्यास आमच्याबद्दल चुकीचे वातावरण निर्माण होऊ शकते, अशी भीती वाटते.'
advertisement
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची दांडी
भारत-पाकिस्तान मॅचसाठी बीसीसीआयचे जास्तीत जास्त अधिकारी उपस्थित राहतात. मात्र, या वेळी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया, आयपीएल अध्यक्ष अरुण घुमल, खजिनदार प्रभतेज भाटिया आणि सहसचिव रोहन देसाई यांच्यापैकी कुणीही दुबईला जाणार नाही. आयसीसी अध्यक्ष जय शहा अमेरिकेत असल्यामुळे तेही या मॅचला उपस्थित राहणार नाहीत. भारत पाकिस्तान सामन्यावरून जय शहा यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
BCCI चा तो एक अधिकारी कोण?
अशा परिस्थितीत, बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रशासकीय सदस्य राजीव शुक्ला हेच या मॅचसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजीव शुक्ला यांचा क्लिन चेहरा असल्याने ते सामन्यानंतर उपस्थित राहू शकतात. राजीव शुक्ला हे सामन्यादरम्यान नव्हे तर सामना झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोर दिसण्याची शक्यता आहे. तोपर्यंत टीम इंडिया पाकिस्तानला लोळवेल, याच शंका नाही.