बॉलिवूडच्या महान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र यांचं क्रिकेट जगतासोबतही खास नातं होतं. टीम इंडियाच्या एका महान क्रिकेटपटूवर धर्मेंद्र स्वतःच्या मुलाएवढंच प्रेम करत होते. धर्मेंद्र यांना क्रिकेटबद्दल विशेष आकर्षण होते. धर्मेंद्र महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला स्वतःचा मुलगा मानत होते. धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीमध्ये सचिन तेंडुलकरचा उल्लेख मुलगा म्हणून केला होता.
advertisement
विमानाने एकत्र प्रवास
धर्मेंद्र आणि सचिन तेंडुलकर यांनी एकदा विमानाने एकत्र प्रवास केला होता. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर केला होता. देशाचा अभिमान... आम्ही विमानात अचानक भेटलो. सचिन नेहमीच मला माझ्या लाडक्या मुलासारखा राहिला आहे. त्याला दीर्घायुष्य लाभो. खूप प्रेम असो... अशी पोस्ट धर्मेंद्र यांनी केली होती.
सचिन तेंडुलकर हा फक्त भारताताच नाही तर जागतीक क्रिकेट मधला सगळ्यात महान खेळाडू आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 100 शतकं केली आहेत, जो विक्रम अजूनपर्यंत कुणालाही मोडता आलेला नाही. 24 वर्षांच्या दीर्घ क्रिकेट करिअरनंतर सचिनने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजारांहून जास्त रन आहेत.
