Eng women beat ind W By 4 Runs : आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कपच्या आजच्या सामन्यात इंग्लंडने भारताच्या हातातोंडाशी आलेला विजय खेचून आणत 4 धावांनी सामना जिंकला आहे. इंग्लंडने या विजयासह थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.तसेच सेमी फायनलमध्ये पोहोचणारी तिसरी टीम ठरली आहे.इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 288 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारत केवळ 284 धावा करू शकली आणि भारताने 4 धावांनी सामना हरला होता. या पराभवानंतर टीम इंडियाच आता पुढे काय होणार? टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचणार का? हे जाणून घेऊयात.
advertisement
भारता विरूद्ध विजयानंतर इंग्लंड आता सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. अशाप्रकारे पॉईट टेबलमध्ये इंग्लंड दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. साऊथ आफ्रिकेला मागे टाकत इंग्लंडने दुसरं स्थान काबीज केले आहे.आणि त्यांच्या संघाच्या नावापुढे क्वालिफाय असे नाव जोडले गेले आहे. इंग्लंडचे आता पाच सामन्यात 4 विजयासह 9 गुण झाले आहेत. तर रनरेट +1.328 आहे. इंग्लंडच्या खालोखाल आता तिसऱ्या स्थानी साऊथ आफ्रिका आहे.आफ्रिकेचे 5 सामन्यात 4 विजयासह 8 गुण आहेत. त्यांचा रनरेट मायनस आहे. तरी देखील हा संघ क्वालिफाय झाला आहे.
त्यानंतर चौथ्या स्थानी भारताचा नंबर लागतो.भारत याआधी देखील चौथ्या स्थानी होता.भारताचे आजची लगातार तिसरी हार आहे. अशाप्रकारे भारत 5 सामन्यात 2 विजय आणि 4 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
चौथा सेमी फायनलीस्ट कोण ठरणार?
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे तीन संघ सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. आता चौथ्या संघासाठी भारत, न्यूझीलंड आणि बांग्लादेश या तीन संघात लढत होणार आहे.
भारताचे पुढील सामने न्युझीलंड आणि बांग्लादेश याच्याविरूद्ध असणार आहे.त्यामुळे एकही सामना गमावला तर भारत बाहेर होण्याची शक्यता आहे.
कसा रंगला सामना
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 288 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा या हेथर नाईटने केल्या. हेथर नाईटने 109 धावांची शतकीय खेळी केली. या खेळीत तिने 1 षटकार आणि 15 चौकार लगावले होते. या व्यतिरीक्त अॅमी जोन्सने 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या दोन्ही खेळाडूंच्या बळावर इंग्लंडने 288 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे भारतासमोर 289 धावांचे आव्हान होते. . भारताकडून दिप्ती शर्माने 4 तर श्री चरणीने 2 विकेट गमावल्या होत्या.
इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सूरूवात खराब झाली. पण नंतर स्मृती मंधाना 88 धावांची अर्धशतकीय खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 70 धावांची अर्धशतकीय खेळी केली. तिच्या सोबत दिप्ती शर्माने 50 धावांची खेळी केली.यावेळी भारत विजयाच्या उंबरठ्यावर असताना दिप्तीने चुकीचा शॉर्ट खेळला आणि टीम इंडिया इथेच मॅच हारली.शेवटी 284 धावापर्यंत भारत मजल मारू शकला आणि 4 धावांनी त्यांचा पराभव झाला.