20 ओव्हर्समध्ये 304 धावांचा डोंगर
या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या एडन मार्करम यांना त्यांच्या निर्णयाचा नक्कीच पश्चात्ताप झाला असेल. कारण, इंग्लंडच्या बॅटर्सनी केवळ 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 304 धावांचा डोंगर उभा केला. फिलिप सॉल्टने 60 बॉलमध्ये नाबाद 141 धावांची रेकॉर्ड ब्रेक इनिंग खेळली. यामध्ये त्याने 15 फोर आणि 8 सिक्स ठोकले. त्याला जोस बटलरची चांगली साथ मिळाली. बटलरने 30 बॉलमध्ये 8 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने 83 धावांची आक्रमक खेळी केली.
advertisement
टीम इंडियाचा रेकॉर्ड मोडीत
तर कर्णधार हॅरी ब्रूकनेही नाबाद राहत 21 बॉलमध्ये 41 धावा केल्या. फिलिप सॉल्टने 39 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे इंग्लंडच्या कोणत्याही बॅटरने केलेले सर्वात जलद शतक आहे. हे त्याच्या टी-20 इंटरनॅशनल कारकिर्दीतील चौथे शतक देखील आहे. टी-20 इंटरनॅशनलमध्ये टीमच्या एकूण धावसंख्येच्या बाबतीत इंग्लंडने भारताचा रेकॉर्ड मोडला आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बांगलादेशविरुद्ध हैदराबादमध्ये भारताने 6 विकेट्सवर 297 धावा केल्या होत्या.
पाहा मॅचची हायलाईट्स
तिसरी सर्वात मोठी धावसंख्या
दरम्यान, टी-20 इंटरनॅशनलमध्ये ही एकूण तिसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. 23 ऑक्टोबर 2024 रोजी झिम्बाब्वेने गांबियाविरुद्ध 4 विकेट्सवर 344 धावा केल्या होत्या पण असे स्कोर क्रिकेटतज्ज्ञ मापात धरत नाहीत. तर 27 सप्टेंबर 2023 रोजी नेपाळने मंगोलियाविरुद्ध 3 विकेट्सवर 314 धावांचा विशाल स्कोर उभा केला होता.