दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला खटला
कोविड-19 साथीच्या काळात औषधांचा साठा आणि विनापरवाना वितरण केल्याच्या आरोपावरून सुरू असलेला गौतम गंभीरविरुद्धचा फौजदारी खटला दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कोर्टाने गंभीरची निर्दोष ठरवलं आहे. यावेळी गंभीरची आई आणि बायको दोघीही अडचणीत आल्या होत्या.
गंभीरची आई आणि पत्नीविरुद्ध तक्रार
advertisement
दिल्ली सरकारच्या ड्रग कंट्रोल डिपार्टमेंटने पूर्व दिल्लीचे तत्कालीन खासदार गौतम गंभीर, त्याची स्वयंसेवी संस्था अपराजिता सिंह, गंभीरची आई सीमा गंभीर आणि पत्नी नताशा गंभीर यांच्याविरुद्ध ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम १८(क) आणि कलम २७(ब)(२) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. सीमा गंभीर आणि नताशा गंभीर या संस्थेच्या विश्वस्त आहेत.
तुरुंगवासाची तरतूद
परवान्याशिवाय औषधांचे उत्पादन, विक्री आणि वितरण करण्यास मनाई आहे. कायद्यानुसार वैध परवान्याशिवाय औषधांची विक्री आणि वितरण केल्यास तुरुंगवासाची तरतूद आहे. मात्र, आता कोर्टाने गंभीर आणि त्याच्या कुटूंबियांना निर्दोष सिद्ध केलं आहे.
फाउंडेशनविरोधातील फौजदारी गुन्हा रद्द
दरम्यान, कोरानाकाळात औषधांचा साठा करून त्याचे वाटप केल्याप्रकरणी गंभीर फाउंडेशनविरोधात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी आपल्या आदेशात गौतम गंभीर आणि फाउंडेशनविरोधातील फौजदारी गुन्हा रद्द केला. कोविड काळात औषधांचा साठा करून वाटप केला, असा आरोप त्याच्यावर केला गेला होता.
