स्वतःवर विश्वास ठेव, कोचने दिला सल्ला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा प्रचंड दबावाखाली होता. त्याने आपला बालपणीचा कोच श्रवण यांना फोन करून, बाहेरचा नॉईज म्हणजेच टीका आपल्या कामगिरीने शांत करायचा आहे, असं म्हटलं होतं. कोच श्रवण यांनी त्याला फक्त 'स्वतःवर विश्वास ठेव' असं सांगितलं. श्रवण यांनी यावेळी गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाबद्दल एक महत्त्वाचा किस्सा सांगितला.
advertisement
गंभीरने स्पष्ट शब्दात खडसावलं
अनेक जण म्हणतात की राणा हा गंभीरच्या जवळचा आहे, पण गंभीरला गुणवत्ता ओळखता येते आणि तो अशा खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देतो. गंभीरने अनेक क्रिकेटपटूंना पाठिंबा दिला असून त्यांनी आपल्या टीमसाठी कमाल केली आहे, असे श्रवण म्हणाले. हर्षितच्या खराब सुरुवातीनंतर गंभीरने त्याला स्पष्ट शब्दात खडसावले होते, असा खुलासा देखील कोचने केला आहे.
परफॉर्म कर, वरना बाहर बिठा दूंगा
गंभीरने त्याला थेट सांगितले होते, "परफॉर्म कर, वरना बाहर बिठा दूंगा" (चांगली कामगिरी कर, नाहीतर तुला टीममधून बाहेर बसवेन). गंभीर हा खेळाडू कोणताही असो, त्याला स्पष्ट संदेश देतो, असंही श्रवण यांनी सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलंय.
हर्षित राणाच्या 4 विकेट्स
पर्थ आणि ऍडलेड येथील सामन्यांमध्ये हर्षित राणाची सुरुवात खराब झाली होती. डाव्या हाताचा पेसर अर्शदीपच्या ऐवजी त्याची सिडनी वनडेसाठी निवड झाली, तेव्हा तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. मात्र, हेड कोच गौतम गंभीरने त्याला वॉर्निंग दिली. त्यामुळे हर्षित राणा सिडनीमध्ये चांगली कामगिरी करू शकला. तिसऱ्या वनडेमध्ये हर्षित राणाने 4 विकेट्स घेऊन टीम इंडियाच्या विजयात मोठे योगदान दिले होते.
