TRENDING:

Team India : गंभीरकडे वेळ कमी, एक चूक घरी पाठवणार... 'संकटमोचक' टीम इंडियाचा पुढचा कोच होणार!

Last Updated:

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 30 रननी पराभव झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवरचा दबाव वाढला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलकाता : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 30 रननी पराभव झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवरचा दबाव वाढला आहे, कारण घरच्या मैदानात झालेल्या मागच्या 6 टेस्टपैकी 4 टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. मागच्या वर्षी न्यूझीलंडने भारताचा भारतामध्ये 3-0 ने पराभव केला. आता दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटीमधील दुसरी टेस्ट जिंकली तर पुन्हा एकदा टीम इंडियावर घरच्या मैदानात व्हाईटवॉश पराभवाची नामुष्की ओढावेल.
गंभीरकडे वेळ कमी, एक चूक घरी पाठवणार... 'संकटमोचक' टीम इंडियाचा पुढचा कोच होणार!
गंभीरकडे वेळ कमी, एक चूक घरी पाठवणार... 'संकटमोचक' टीम इंडियाचा पुढचा कोच होणार!
advertisement

घरचं मैदान हे भारतासाठी अभेद्य असा बालेकिल्ला होतं, पण गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडियाच्या कामगिरीला उतरती कळा लागली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारताचा पराभव झाला तर भारतीय चाहते स्वीकारत होते, पण आता घरच्या मैदानात होत असलेल्या पराभवामुळे गौतम गंभीर माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने तर टीम इंडियाचा पुढचा कोच कोण होणार? हेदेखील सांगून टाकलं आहे.

advertisement

गंभीरवर दबाव वाढला

'अर्थातच, दबाव वाढत आहे. यात काही शंका नाही. मागील काही काळात, जर तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेलात तर तुमचा पराभव निश्चित असायचा आणि कोणालाही वाईट वाटायचे नाही. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडमध्ये तुम्ही पराभव पत्करला होता; ते होणारच होते. पण भारतात पराभव स्वीकारार्ह नाही कारण तो तुमचा बालेकिल्ला आहे. दक्षिण आफ्रिकेने हा किल्ला तोडला आणि न्यूझीलंडने येऊन व्हाईटवॉश केलं', असं कैफ म्हणाला आहे.

advertisement

गौतम गंभीरवरील वाढत्या शंकांवर मोहम्मद कैफने प्रकाश टाकताना व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव पुढे आले आहे. याव्यतिरिक्त, कैफने संकेत दिले की जर टेस्ट क्रिकेटमध्ये परिस्थिती लवकर सुधारली नाही तर मुख्य प्रशिक्षकपदासाठी लवकरच नवीन दावेदार येऊ शकतात. त्या नावांपैकी, व्हीव्हीएस लक्ष्मण हा सर्वात चर्चेत असल्याचं कैफने सांगितलं.

लक्ष्मणकडे अनुभव

व्हीव्हीएस लक्ष्मणकडे टेस्ट क्रिकेटचा अनुभव आहे, तसंच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि वेगवेगळ्या टीमचा प्रशिक्षकही राहिला आहे. बीसीसीआयने बदलाचा विचार केला तर लक्ष्मण टेस्ट प्रशिक्षक म्हणून गंभीरची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार असू शकतो, असा दावाही कैफने केला आहे. 'गंभीरवर दबाव वाढत आहे, म्हणूनच लक्ष्मणचं नाव पुढे येईल. प्रशिक्षकपदाच्या रेसमध्ये इतर नावंही आहेत', असं वक्तव्य कैफने केलं आहे.

advertisement

भारतामध्ये प्रशिक्षक निवडण्याची प्रक्रिया खुली आणि स्पष्ट नाही, जितकी ती असायला पाहिजे, यामुळे भारतीय क्रिकेटचे नुकसान होत आहे, अशी खंतही मोहम्मद कैफने व्यक्त केली आहे. अनेक अनुभवी माजी खेळाडू प्रशिक्षकपदासाठी अर्ज करतात, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. प्रशिक्षकांना अनेकवेळा मुलाखतीशिवाय नियुक्त केलं जातं, असं रोखठोक मत कैफने मांडलं आहे.

'जर आपण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आणि तो नाकारला गेला तर काय? माजी खेळाडूसाठी हे अपमानास्पद आहे. प्रत्येकवेळी पात्र व्यक्तीला नियुक्त केलं जातंच असं नाही. गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर त्याने सितांशू कोटक आणि अभिषेक नायर यांना आणलं आणि बीसीसीआयने हे मान्य केलं', असं कैफ म्हणाला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वय अवघे साडेसात वर्षे, अर्णवीने केली कमाल, 2500 फूट उंचीवरील शिखर केले सर, Video
सर्व पहा

'मला वाटते की पारदर्शकतेची गरज आहे. ज्यांनी एक लाख लोकांच्या गर्दीसमोर मॅच जिंकवून दिली आहेस त्यांना पाठिंबा द्यायला हवा. पण त्याऐवजी 3-4 मॅच खेळलेले खेळाडू टीमचा भाग होतात. सितांशू कोटक टीममध्ये आले तेव्हा कोणतीही मुलाखत झाली नाही', असा आरोप कैफने केला आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : गंभीरकडे वेळ कमी, एक चूक घरी पाठवणार... 'संकटमोचक' टीम इंडियाचा पुढचा कोच होणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल