खरं तर गौतम गभीरच्या नेतृत्वात टीम इंडियात संक्रमणातून जात आहेत.गौतम गंभीर अनेक खेळाडूंना संधी देत असल्याने आणि रणनितीत सतत बदल करत असल्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागत आहे,असा अनेकांचा आरोप आहेत.त्यामुळेच पराभवानंतर ज्यावेळेस गौतम गंभीर मैदानात आला. तेव्हा काही चाहत्यांनी 'गौतम गंभीर हाय हाय, गौतम गंभीर हाय हाय' अशा आशयाच्या घोषणा दिल्या होत्या. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला होता.
advertisement
दरम्यान टीम इंडियाच्या पराभवानंतर चाहत्यांना राग येणे साहजिक होते. पण गौतम गंभीर विरोधात अशा प्रकारची घोषणाबाजी करणे बरोबर नव्हते. यावेळी मैदानात सगळे खेळाडू देखीर गौतम गंभीर सोबत उभे होते.त्यामधून कुणीच चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला नाही. पण नंतर टीम इंडियाचा डीएसपी सिराज गौतम गंभीरच्या मदतीला धावला त्याने तोंडावर बोट ठेवून इशाऱ्यांमध्ये चाहत्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरी देखील चाहते शांत होत नव्हते.त्यानंतर मोहम्मद सिराजने चाहत्यांच्या आणखी जवळ जाऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत टीम इंडियाचा बॅटींग कोच सितांशु कोटकने देखील चाहत्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता.या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे.
