Fans Aggression on Gautam Gambhir Guwahati : कर्णधार टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाचा 408 धावांनी पराभव केला आहे.या पराभवसह 2-0ने मालिका जिंकून आफ्रिकेन क्लिन स्वीप दिला आहे.विशेष म्हणजे 25 वर्षानंतर आफ्रिकेने भारतात टेस्ट मालिका जिंकली आहे.त्यामुळे गौतम गंभीर आणि टीम इंडियाच्या खेळाडूच्या कामगिरीवर चाहते प्रचंड निराश झाले आहेत. याच निराशेतून भारताच्या पराभवानंतर फॅन्सनी गौतम गंभीरला मैदानात फॅन्सने टार्गेट केलं होतं. त्यामुळे मैदानात मोठा ड्रामा झाला होता. या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे
advertisement
खरं तर भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय फॅन्स प्रचंड भडकले आहेत. त्यामुळेच फॅन्सने थेट मैदानात असलेल्या गौतम गंभीरला टार्गेट करायला सूरूवात केली. 'गौतम गंभीर हाय हाय, गौतम गंभीर हाय हाय' असे नारे द्यायला फॅन्सनी सूरूवात केली होती. विशेष म्हणजे फॅन्स हे नारे देत असताना गौतम गंभीर पाठमोरा उभा असताना दिसत आहे.त्याने या संपूर्ण प्रकरणावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण ग्राऊंड स्टाफने गौतम गंभीर विरोधात घोषणाबाजी देणाऱ्या चाहत्यांना पकडलं होतं.त्यामुळे मैदानात भयंकर ड्रामा झाला होता.
पराभवानंतर गंभीर काय म्हणाला?
टीम इंडियाच्या पराभवाला कुणी एक खेळाडू जबाबदार नाही. पराभवाला सर्वच खेळाडू जबाबदार आहेत. रेड बॉल क्रिकेटमध्ये खुप सुधारणा करण्याची गरज आहे. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जास्त नाही पण रेड बॉल क्रिकेटमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दोष सर्वांवर असतो, पण सुरुवात माझ्यापासून होते, असं म्हणत गंभीरने हात झटकण्याचा प्रयत्न केला.
क्रिकेटमध्ये टीमच्या भविष्याचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे टीम इंडियाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मी तोच आहे, ज्याने इंग्लंडमध्ये रिझल्ट दाखवून दिला आहे, तेही याच संघासोबत... त्यामुळे आता बीसीसीआयला निर्णय घ्यायचा आहे. बीसीसीआय माझ्या भविष्याचा निर्णय घेईल. टीम इंडिया सर्वात महत्त्वाची आहे, गंभीर नाही, असं गौतम गंभीर म्हणाला आहे. ड्रेसिंग रुमची जबाबदारी घेतली पाहिजे. जबाबदारी घेण्यापेक्षा ड्रेसिंगमध्ये काळजी घेण्याची भूमिका महत्त्वाची आहे, असंही गंभीर म्हणाला आहे.
दरम्यान, मी तोच माणूस आहे ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आशिया कप जिंकला, असं म्हणत गंभीरने स्वत:ला क्रेडिट दिलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मानसिकदृष्ट्या मजबूत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही वॉशिंग्टन सुंदरकडून आश्विनसारखी अपेक्षा ठेवत असाल तर ते चुकीचं आहे. ही युवा टीम आहे, त्यामुळे अनुभवाची आणि वेळेची गरज आहे, असं गौतम गंभीर म्हणाला आहे.
