तुमच्या यूट्यूब चॅनेलसाठी काहीही...
सोशल मीडिया ट्रोलिंग अजिबात योग्य नाही आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार करा. कुणाचंही मूल क्रिकेट खेळेल आणि इंडिया क्रिकेट चांगले करेल यासाठी आपण सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तुमच्या यूट्यूब चॅनेलसाठी काहीही वाईट बोलू नका, असं म्हणत गौतम गंभीरने आर अश्विनवर सडकून टीका केली आहे.
advertisement
मला लक्ष्य करा
दरम्यान, तुम्हाला करायचेच असेल तर मला लक्ष्य करा, मी ते सहन करू शकतो, पण त्या मुलाला एकटं सोडा. हे सर्व युवा स्टार्ससाठी लागू आहे. गंभीर यांनी असं सांगत ट्रोल करणाऱ्यांना त्यांच्या यूट्यूब चॅनेलसाठी कॉन्टेंट मिळवण्यासाठी युवा खेळाडूंना लक्ष्य न करण्याची विनंती केली आहे.
काय म्हणाला होता आर अश्विन?
हर्षित राणाला का निवडण्यात आले हे मला समजून घ्यायचे आहे. निवड समितीच्या बैठकीत उपस्थित राहून का निवडले हे मला कळले असते तर बरे झाले असते. मला वाटते की ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला एका वेगवान गोलंदाजाची गरज आहे जो फलंदाजी देखील करू शकतो, असं आर अश्विन म्हणाला होता. हर्षित राणामध्ये नक्कीच काहीतरी खास आहे. तो निवडीस पात्र आहे की नाही यावर वाद होऊ शकतो, पण त्याच्याकडे प्रतिभा आहे हे विसरू नये, असंगी आर अश्विन म्हणाला होता.
हर्षित राणा गंभीरच्या इशाऱ्यावर नाचतोय?
दरम्यान, दिल्ली टेस्टआधी टीम इंडियाच्या खेळाडूंना गौतम गंभीरने डिनरसाठी घरी बोलवलं होतं. त्यावेळी गंभीरचा लाडका हर्षित राणा देखील टीममध्ये नसताना गंभीरच्या घरी आला होता. ते पण स्पेशल कारने... त्यामुळे हर्षित राणा गंभीरच्या इशाऱ्यावर नाचतोय, अशी टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. अशातच आता गंभीरने टीका करणाऱ्यांवर तोंडसूख घेतलं आहे.