आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन
रांची येथे झालेल्या पहिल्या सामनात भारताने विजय मिळवला असला तरी, या विजयानंतर हर्षित राणाला आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ताकीद मिळाली आहे. ही कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी पाळावयाच्या शिस्तीचे महत्त्वाची असल्याचं आयसीसीने म्हटलं आहे. पण मॅचमध्ये काय झालं होतं? पाहा
ब्रेविस आऊट झाला अन्...
advertisement
हा प्रसंग दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 22 व्या ओव्हरमध्ये घडला. जेव्हा भारतीय पॅसर हर्षित राणा याने साऊथ अफ्रिकन फलंदाज डेवाल्ड ब्रेविस याला आऊट केलं. ब्रेविस आऊट झाल्यानंतर, हर्षित राणाने त्याला ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाण्याचा हावभाव केला. आयसीसीने (ICC) हर्षितचे हे कृत्य खेळाडू आणि सपोर्ट कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन मानले आहे.
दंडात्मक कारवाई नाही पण...
कलम 2.5 हे 'फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याला चिथावणी देणारी किंवा अपमानजनक भाषा, कृती किंवा हावभाव वापरण्याशी' संबंधित आहे. हर्षित राणाची ही कृती फलंदाजाकडून आक्रमक प्रतिसाद मिळवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, असं मानलं गेलं आहे. त्यामुळे हर्षितवर ताकीद म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात आली नसून, त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक 'डेमेरिट पॉइंट' जोडला गेला आहे.
फक्त ताकीद मिळाली
दरम्यान, मागील 24 महिन्यांतील हा त्याचा पहिलाच गुन्हा असल्याने, त्याला फक्त ताकीद मिळाली आहे. हर्षितने आपला गुन्हा मान्य केला असून, मॅच रेफ्री रिची रिचर्डसन (Richie Richardson) यांनी प्रस्तावित केलेली शिक्षा स्वीकारली आहे.
