पानीपत, 16 ऑक्टोबर : भारतातील हरियाणा राज्यातील खेळाडूंनी प्रत्येक वेळेनुसार, यावेळीही चीनमध्ये झालेल्या आशिया स्पर्धेत भारताचे नाव मोठे करत देशाला अनेक पदके जिंकून दिली. यानंतर आता पॅरा आशियाई खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची वेळ आली आहे. यासाठी भारताच्या खेळाडूंकडून चांगल्या प्रदर्शनाची आशा व्यक्त केली जात आहे.
यामध्ये हरयाणा राज्यातील पानीपतच्या सिवाह गावाची सून सुमन यांची पॅरा आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता 17 ऑक्टोबरला त्या चीनला जातील आणि त्याठिकाणी देशासाठी चांगली कामगिरी करतील. वेटलिफ्टिंगमध्ये सुमनची निवड झाली आहे. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुमनची निवड झाल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तसेच तिचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
advertisement
तिच्या कुटुंबांनी आशा व्यक्त केली आहे की, ती देशासाठी नक्की सुवर्णपदक जिंकूनच भारतात परतेल. विशेष म्हणजे सुमन ही हरियाणा राज्यातील पॅरा आशियाई स्पर्धेत भाग घेणारी एकमेव महिला खेळाडू आहे.
2021 मध्ये सुरू केले होते वेटलिफ्टिंग -
2021 मध्ये सुमनने वेटलिफ्टिंगची तयारी सुरू केली होती. पण त्यांची मेहनत आणि जिद्द यामुळे अगदी कमी वेळात त्या इथपर्यंत पोहोचल्या. आता 17 ऑक्टोबरला त्या चीनला जाणार आहेत आणि पॅरा आशियाई स्पर्धेत भाग भारताचे प्रतिनिधित्त्व करतील.
पतीने साथ दिली, हिम्मत वाढली -
सुमन सुरुवातीला व्हॉलिबॉल खेळायच्या. जवळपास तीन वर्षांपर्यंत त्यांनी व्हॉलिबॉल खेळ खेळून सुवर्णपदकही जिंकले. दरम्यान, एक दिवस त्यांच्यासोबत त्यांचे पती व्हॉलिबॉल स्पर्धेत गेले असता पतीने त्यांना वजन उचलवून पाहिले तर पहिल्याच प्रयत्नात सुमन यांनी खूप जास्त वजन उचलले.
तेव्हा त्यांचे पती प्रदीप यांना जाणवले की, त्यांची पत्नी वेटलिफ्टिंगमध्येही चांगला खेळ करू शकते आणि खूप पुढे जाऊ शकते. त्यामुळे त्यानंतर त्यांनी आपली पत्नी सुमन यांची गावातीलच जीममध्ये तयारी सुरू केली. यानंतर त्यांची पत्नीने अत्यंत मेहनत करुन आपल्या बळावर अनेक पदके जिंकली. आता त्यांची पॅरा आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे. देशासाठी सुवर्णपदक जिंकेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दोन मुलांच्या आई आहेत सुमन -
सुमन या गृहिणी आहेत. तसेच त्यांना दोन मुलेही आहेत. सुमन सुरुवातीला शिलाई सेंटरही चालवायच्या आणि दुसऱ्या मुलींनाही ट्रेनिंग द्यायच्या. सोबतच क्रीडा हे त्यांनी आपले करिअर निवडले आणि आता आपल्या मेहनतीच्या बळावर त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या आहेत.