या सगळ्या वादाच्या मध्यभागी असलेली मेरी डिकोस्टा आता समोर आली आहे. पापाराझी विरल भयानी याने मेरी डिकोस्टासोबतच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यात मेरी डिकोस्टाने तिच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. 'पलाश मुच्छलवर फसवणूक केल्याचा आरोप होत आहे, पण ती व्यक्ती मी नाही. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत, तसंच माझ्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आहेत. चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं त्वरित थांबवा', असं मेरी डिकोस्टा म्हणाली आहे.
advertisement
मेरी डिकोस्टाने तिच्यावर होणारे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच संपूर्ण काळात पलाश मुच्छलसोबतचे आपले सगळे संवाद व्यावसायिक राहिले आहेत. सोशल मीडियावरच्या निष्काळजीपणामुळे आपल्याला खूप त्रास झाला आहे, असंही मेरी डिकोस्टाने स्पष्ट केलं आहे.
मेरी डिकोस्टाचे वकील तिच्यावर झालेल्या बदनामीविरोधात कारवाई करण्याची शक्यता तपासत आहेत. सनसनाटीऐवजी सत्य तपासून पाहा, अशा अफवांमुळे माझं वैयक्तिक नुकसान होत आहे, असंही मेरी डिकोस्टा म्हणाली आहे. आतापर्यंत स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
आतापर्यंत नेमकं काय झालं?
रविवार 23 नोव्हेंबरला स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा सांगलीमध्ये विवाहसोहळा पार पडणार होता, पण सकाळीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती खराब झाली, त्यानंतर त्यांना तातडीने सांगलीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीमध्ये स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका लागल्याचं स्पष्ट झालं, त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दुसरीकडे पलाश मुच्छलची प्रकृतीही बिघडली त्यानंतर त्याला मुंबईच्या गोरेगावमधल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं. यानंतर स्मृती मानधना आणि भारतीय महिला क्रिकेट टीमच्या काही खेळाडूंनी सोशल मीडियावरून लग्नासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले. पलाशची बहीण पलक मुच्छलने स्मृतीच्या वडिलांची तब्येत खराब झाल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं स्पष्ट केलं.
