Rohit Sharma News : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेची तयारी करतो आहे. ही मालिका सूरू व्हायला अजूनही 20 दिवस उरले आहेत. या दरम्यान तो मैदानात प्रचंड घाम गाळतो आहे. या मालिकेआधी रोहित शर्मा प्रचंड भावूक झाला आहे. 2023 च्या वर्ल्ड कप पराभवाच्या आठवणी सांगताना त्याच्या मनात नेमके काय विचार आले होते. त्याची अवस्था नेमकी कशी होती? या सगळ्या गोष्टीचा खुलासा रोहित शर्माने केला आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
रविवारी गुडगाव येथे झालेल्या मास्टर्स युनियन कार्यक्रमात रोहित शर्माने आयुष्यात आलेल्या सगळ्यात कठीण काळावर भाष्य केले. रोहितच्या आयुष्यात हा कठीण काळ 2023 च्या वर्ल्डकप पराभवानंतर आला होता. या पराभवानंतर रोहितने क्रिकेट सोडण्याचाही विचार केला होता. कारण रोहितने भारताला प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकून देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते.त्यामुळे त्या धक्कादायक पराभवाला पचवण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला वेळ हवा आहे.
"हा पराभव पचवणे कठीण होते पण मला माहित होते की आयुष्य इथे संपत नाही. माझ्यासाठी हा एक धडा होता, 'मी ते मागे कसे सोडून काहीतरी नवीन कसे सुरू करू शकतो' कारण आयुष्य तिथे संपत नाही. मला माहित होते की पुढे काहीतरी वेगळे येणार आहे, अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये 2024 चा टी२० विश्वचषक आणि मला माझे सर्व लक्ष तिथेच केंद्रित करायचे होते. हे आत्ता माझ्यासाठी सांगणे खूप सोपे आहे पण त्यावेळी ते करणे खूप कठीण होते. एका क्षणी, मला अक्षरशः वाटले की मला आता क्रिकेट खेळायचा नाही कारण त्याने माझ्या शरीरातून सर्व काही काढून टाकले आहे आणि माझ्यात काहीही शिल्लक नाही, असे रोहित शर्माने सांगितले.
"मला परत येण्यासाठी थोडा वेळ लागला कारण मी स्वतःला आठवण करून देत राहिलो की ही अशी गोष्ट आहे जी मला आवडते आणि स्वप्नात पाहिले होते. ती माझ्या समोर आहे आणि मी ती इतक्या सहजपणे जाऊ देऊ शकत नाही. "फिल्डवर परत येण्यासाठी आणि पुन्हा सुरुवात करण्यासाठी थोडा वेळ आणि भरपूर ऊर्जा लागली,असे देखील रोहित सर्वांसमोर कबूल केले.
दरम्यान रोहित शर्मा त्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, त्याने 11 डावात 54.27 च्या सरासरीने 597 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतके होती.
फायनलमध्ये भारताचा पराभव कसा झाला?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. तसेच अहमदाबादमध्ये भारताचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरूद्ध पार पडला होता.या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 240 पेक्षा कमी धावसंख्येपर्यंत मर्यादित ठेवले होते. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्स शिल्लक ठेवून फायनल जिंकली होती.
