कोलंबो: आयसीसी महिलांच्या वनडे वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताच्या डावाची सुरूवात स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल या दोघींनी केली. या दोघींनी संघाला चांगली सुरूवात करुन दिली होती. भारताने 7 ओव्हरमध्ये 36 धावा केल्या होत्या. अशात पाकिस्तानकडून डायना बेग आठवी ओव्हर टाकण्यासाठी आली. या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्मृतीने चौकार मारला. त्यानंतर पाचव्या चेंडू स्मृतीच्या पॅडला लागला आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनी LBWसाठी अपील केली. ज्यावर अंपायरने बाद नसल्याचे सांगितले. मात्र गोलंदाज आणि अन्य खेळाडू Review घेण्याचा विचार केला. पाकिस्तानची विकेटकीपर सिद्रा नवाज Review घेण्याच्या विरोधात होती. मात्र डायना बेगने कर्णधाराकडे Reviewचा आग्रह धरला आणि अखेरच्या क्षणी Review घेण्यात आला.
advertisement
तिसऱ्या अंपायरने जेव्हा रिप्लेमध्ये पाहिले तेव्हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला होता. त्यामुळे पाकिस्तानने Review गमावला. विशेष म्हणजे डायना बेगने 8 वर्षापूर्वी म्हणजे 2017च्या वर्ल्डकपमध्ये स्मृतीला बाद केले होते. त्यामुळेच की काय अती आत्मविश्वासात तिने यावेळी देखील स्मृती विरोधात अपील केली आणि reviewचा हट्ट धरला.
या चेंडूनंतर पुढच्या म्हणजेच 6व्या चेंडूवर स्मृतीने आणखी एक चौकार मारून डायना बेगला सनसनीत उत्तर दिले. अर्थात स्मृतीला मोठी खेळी करता आली नाही. 9व्या ओव्हरमध्ये ती 23 धावांवर बाद झाली.
स्पर्धेत भारताची ही दुसरी मॅच असून याआधी पहिल्या लढतीत टीम इंडियाने श्रीलंकेच्या महिला संघाचा पराभव केला होता. साखळी फेरीत भारताला एकूण 7 सामने खेळायचे आहेत.