अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे दोन देश संयुक्तपणे 2024 चा टी 20 वर्ल्ड कप आयोजित करणारा आहेत. वर्ल्ड कपला अजून 6 महिने बाकी असले तरी याची उत्सुकतता आतापासूनच निर्माण झाली आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये होईल. हा सामना 8 जून किंवा 9 जून रोजी खेळवण्यात येईल. या सामन्याची अंतिम तारीख अजून ठरलेली नाही पण भारत-पाकिस्तान सामना शनिवारी किंवा रविवारी होणार आहे.
advertisement
IND VS SA 3rd ODI Match : द. आफ्रिकेने टॉस जिंकला, रजत पाटीदारचे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण
मोठी बातमी म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दिवस-रात्र नसून सकाळी सुरू होणार आहे. अमेरिकेत सकाळी हा सामना आयोजित करण्यामागचा एकमेव उद्देश हा आहे की भारतातील लोक योग्य वेळी हा सामना पाहू शकतील. अमेरिकेत सकाळ होते तेव्हा भारतात रात्र असते. भारत-पाकिस्तान सामन्याचा सर्वात मोठा चाहतावर्ग या दोन देशांमध्ये आहे, त्यामुळे हा सामना अमेरिकेत दिवसा खेळवला जाईल. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हा पहिल्यांदाच दिवसा खेळवण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे सर्व सामने अमेरिकेतच खेळवले जातील, असा दावा देखील मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. अनेक भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत राहतात आणि टीम इंडियाचे तिथे खूप चाहते आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.