IND VS SA 3rd ODI Match : द. आफ्रिकेने टॉस जिंकला, रजत पाटीदारचे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
भारत विरुद्ध द. आफ्रिका सामन्यात साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकला असून टीम इंडियाने प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल केले आहेत.
मुंबई, 21 डिसेंबर : सध्या टीम इंडिया द. आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून तेथे ते टी 20, वनडे आणि टेस्ट सिरीज खेळणार आहेत. आज भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यात वनडे सीरिजमधला तिसरा आणि शेवटचा सामना खेळला जाणार असून यात कोणता संघ बाजी मारून सिरीज नावावर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सामन्यात साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकला असून टीम इंडियाने प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल केले आहेत.
द. आफ्रिकेचा बोलंड पार्क या क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध द. आफ्रिकेचा तिसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी अर्धातास आधी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस पार पडला. हा टॉस द. आफ्रिकेने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया 2017 आणि 2018 नंतर द. आफ्रिके विरुद्ध वनडे सिरीज खेळत आहे. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने द. आफ्रिकेचा धुव्वा उडवला होता आणि सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी मिळाली होती. तर दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवून सिरीज 1-1अशा बरोबरीत आणली. तेव्हा आजचा तिसरा सामना हा निर्णायक ठरणार आहे.
advertisement
आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीची चमक दाखवणारा खेळाडू रजत पाटीदारने भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला प्लेईंग 11 मध्ये बाहेर बसवण्यात आले असून त्या ऐवजी रजत पाटीदार याला संधी देण्यात आली आहे. तर कुलदीप यादवला देखील विश्रांती देण्यात आली असून त्याऐवजी संजू सॅमसनला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली आहे. रजत पाटीदारने आयपीएलमध्ये एकूण १२ सामने खेळले असून त्यात ४०४ धावा केल्या आहेत.
advertisement
टीम इंडियाची प्लेईंग 11 : संजू सॅमसन, साई सुदर्शन, रजत पाटीदार, तिलक वर्मा, केएल राहुल, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 21, 2023 4:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND VS SA 3rd ODI Match : द. आफ्रिकेने टॉस जिंकला, रजत पाटीदारचे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण