Tushar Deshpande Marriage : धोनीच्या CSK मधील मराठमोळा क्रिकेटर अडकला लग्नबंधनात, बालपणीच्या क्रशसोबत केला विवाह

Last Updated:

आयपीएल 2024 पूर्वी महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समधील तुषार देशपांडे हा खेळाडू लग्नबंधनात अडकला आहे. जून महिन्यात चेन्नई सुपरकिंग्समधील फास्ट बॉलर तुषार देशपांडेने त्याची लहानपणीची क्रश असलेल्या नभा गडमवार हिच्याशी साखरपुडा केला होता.

धोनीच्या CSK मधील मराठमोळा क्रिकेटर अडकला लग्नबंधनात
धोनीच्या CSK मधील मराठमोळा क्रिकेटर अडकला लग्नबंधनात
मुंबई, 21 डिसेंबर : सध्या सर्वत्र लग्न सराईचा माहोल सुरु असून अनेक जोडपी शुभ मुहूर्तावर लग्नबंधनात अडकत आहेत. असे असतानाच आता आयपीएल 2024 पूर्वी महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्समधील तुषार देशपांडे हा खेळाडू लग्नबंधनात अडकला आहे. जून महिन्यात चेन्नई सुपरकिंग्समधील फास्ट बॉलर तुषार देशपांडेने त्याची लहानपणीची क्रश असलेल्या नभा गडमवार हिच्याशी साखरपुडा केला होता.
आयपीएल 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम लागू झाल्यानंतर तुषार देशपांडे हा सिझनमधला पहिला इम्पॅक्ट प्लेअर ठरला होता. त्याने चेन्नई सुपरकिंग्स कडून आयपीएल 2023 च्या 16 मॅच खेळताना 21 विकेट्स घेतल्या होत्या. गुरुवारी 21 डिसेंबर रोजी तुषार देशपांडे त्याची मैत्रीण नभा सोबत कल्याण येथे लग्न बंधनात अडकला आहे. कल्याणमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. तुषार देशपांडेची पत्नी नभा गंडांमवार ही एक फॅशन डिझायनर आहे.
advertisement
आयपीएलच्या 16 व्या हंगामात तुषारने प्रभावी कामगिरी केली, तो पर्पल कॅपच्या शर्यतीत सहाव्या क्रमांकावर होता. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्सने देखील त्याच्यावर विश्वास टाकून त्याला आयपीएल 2024 साठी रिटेन केले. तुषारनं चेन्नईकडून आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. तुषार देशपांडे नर्सरीपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण कल्याण मधील केसी गांधी या शाळेत झालेले आहे. इयत्ता चौथीमध्ये असताना तुषारला 14 वर्षाखालील क्रिकेट सामन्यात खेळण्याची संधी या शाळेतून मिळाली. वेगवेगळ्या सामन्यांमध्ये संधी मिळाल्यामुळे आणि कोचच्या मार्गदर्शनामुळे तो यशाच्या पायऱ्या चढत राहिला. तुषार यापूर्वी रणजी ट्रॉफी देखील खेळाला आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Tushar Deshpande Marriage : धोनीच्या CSK मधील मराठमोळा क्रिकेटर अडकला लग्नबंधनात, बालपणीच्या क्रशसोबत केला विवाह
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement