IPLमधील बोलीचे सगळे पैसे खेळाडूलाच मिळतात का? दुखापत झाल्यास किती पैसे मिळतात? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कोणत्या संघाकडे कोणता खेळाडू गेला? कोणत्या खेळाडूला किती पैशांत विकत घेतलं? याबद्दल लोकांना जाणून घ्यायला आवडते. एवढेच नाही तर याबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न देखील आहेत.
मुंबई, 21 डिसेंबर : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLचं नवीन हंगाम लवकर सुरु होणार आहे. दरम्यान बुधवारी खेळाडूंची बोली लावली गेली. 10 फ्रेंचायझी संघांनी त्यांच्या आवडत्या खेळाडूंवर जोरदार बोली लावली. या ऑक्शनमध्ये एकूण 72 खेळाडूंवर बोली लावण्यात आली, त्यात 30 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्यावर लावल्या गेलेल्या बोली किंवा रक्कम या खरंच लक्षणीय ठरल्या. त्यात ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
आयपीएलच्या खेळाबद्दल लोकांना जितकी उत्सुक्त असते, तितकीच उत्सुकता लोकांना याच्या ऑक्शनबद्दल पण असते. कोणत्या संघाकडे कोणता खेळाडू गेला? कोणत्या खेळाडूला किती पैशांत विकत घेतलं? याबद्दल लोकांना जाणून घ्यायला आवडते. एवढेच नाही तर याबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न देखील आहेत.
जसे या खेळाडूंना ऑक्शनचे पूर्ण पैसे मिळतात का? किंवा त्यांना दुखापत झाली तर काय होतं, अशावेळी पैसे कसे दिले जातात? चला या संपूर्ण प्रोसेसबद्दल जाणून घेऊ.
advertisement
ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाताने या वेगवान गोलंदाजाला आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक 24.75 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. हर्षल पटेल हा सर्वात महागडा भारतीय होता, ज्याला पंजाबने 11.75 कोटी रुपये देऊन खरेदी केले.
सर्व पैसे खेळाडूंना मिळतात का?
लिलावात खेळाडूंना संपूर्ण रकमेची बोली मिळते का, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. उत्तर होय आहे. बोलीची रक्कम कितीही असली तरी ती खेळाडूचा वार्षिक पगार आहे. पण त्यावर नियमानुसार कर आकारला जातो. उदाहरणार्थ, चेन्नईने समीर रिझवीला 8.4 कोटी रुपयांना विकत घेतले, तर हे पैसे त्यांचे असतील, त्यानंतर त्यावर कर आकारला जाईल. ही संपूर्ण वर्षभरासाठी दिलेली रक्कम असेल.
advertisement
परदेशी खेळाडूंच्या बाबतीत 20 टक्के रक्कम त्यांच्या क्रिकेट बोर्डाच्या खात्यात जाते. उदाहरणार्थ, समजा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला 20 कोटी रुपये मिळाले, तर त्यातील ४ कोटी रुपये ऑस्ट्रेलिया क्रिकेटबोर्डकडे जातील.
खेळाडूंना पैसे कधी मिळतात?
प्रत्येक फ्रँचायझी संघ वेगळ्या पद्धतीने त्यांच्या खेळाडूंना पैसे देतात. काही संपूर्ण रक्कम आगाऊ देतात तर काही फ्रँचायझी हंगामापूर्वी 50 टक्के आणि त्यानंतर उर्वरित रक्कम देण्यास प्राधान्य देतात. काही संघ तीन भागांतही पैसे देतात.
advertisement
खेळाडू जखमी झाला तर त्याला ही रक्कम मिळते का?
याबाबतही दोन अटी आहेत. समजा हंगामात एखादा खेळाडू जखमी झाला किंवा त्याआधी कोणीतरी जखमी झाले, तर दोन्ही परिस्थितींमध्ये ही रक्कम ठरवलेल्या रकमेपेक्षा वेगळी दिली जाते. हंगामापूर्वी एखादा खेळाडू जखमी होऊन खेळायला आला नाही, तर संघाला पैसे देण्याची गरज नाही. जर खेळाडू सामन्यासाठी उपलब्ध असेल आणि त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही तर त्याला त्याचे पूर्ण वेतन मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 21, 2023 8:40 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPLमधील बोलीचे सगळे पैसे खेळाडूलाच मिळतात का? दुखापत झाल्यास किती पैसे मिळतात? जाणून घ्या संपूर्ण समीकरण