TRENDING:

IND vs AUS : स्टार्कचा रोहितला 176.5 च्या स्पीडने बॉल! शोएब अख्तरचं रेकॉर्ड मोडलं? सत्य अखेर समोर आलं

Last Updated:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये स्टार्कने रोहित शर्माला पहिलाच बॉल टाकला, स्पीड मीटरमध्ये हा बॉल 176.5 किमी प्रती तासाच्या वेगाचा असल्याचं दाखवण्यात आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव झाला. या सामन्यात सुरूवातीपासूनच टीम इंडिया बॅकफूटवर होती, कारण रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या विकेट भारताने पहिल्या 9 ओव्हरमध्येच गमावल्या. या सामन्यात मिचेल स्टार्कने वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं का? स्टार्कने रोहित शर्माला मॅचचा पहिलाच बॉल टाकला, स्पीड मीटरमध्ये हा बॉल 176.5 किमी प्रती तासाच्या वेगाचा असल्याचं दाखवण्यात आलं, जो शोएब अख्तरच्या विश्वविक्रमापेक्षाही जलद आहे.
स्टार्कचा रोहितला 176.5 च्या स्पीडने बॉल! शोएब अख्तरचं रेकॉर्ड मोडलं? सत्य अखेर समोर आलं
स्टार्कचा रोहितला 176.5 च्या स्पीडने बॉल! शोएब अख्तरचं रेकॉर्ड मोडलं? सत्य अखेर समोर आलं
advertisement

क्रिकेट इतिहासातील सगळ्यात फास्ट बॉल

क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात फास्ट बॉल शोएब अख्तरच्या नावावर आहे. शोएब अख्तरने 2003 वर्ल्ड कपवेळी इंग्लंडचा बॅटर निक नाईटला 161.3 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकला होता. क्रिकेटच्या इतिहासामध्ये नोंद झालेल्या बॉलपैकी हाच बॉल सगळ्यात जलद आहे, पण रविवारी मिचेल स्टार्कने रोहित शर्माला टाकलेला बॉल 176.5 किमी प्रती तासाच्या वेगाने दाखवण्यात आला.

advertisement

काय आहे सत्य?

सोशल मीडियावर मिचेल स्टार्कच्या या बॉलनंतर एक स्क्रीनशॉटही व्हायरल झाला, ज्यात त्याने रोहित शर्माला 176.5 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकल्याचा, तसंच शोएब अख्तरचं वर्ल्ड रेकॉर्ड मोडल्याचा दावा करण्यात आला, पण मिचेल स्टार्कने टाकलेला हा बॉल 176.5 किमीचा नव्हता.

मिचेल स्टार्कने टाकलेला मॅचचा पहिला बॉल 140.8 किमी प्रती तासाच्या वेगाने टाकला होता, पण टेकनिकल चुकीमुळे हा बॉल 176.5 किमी प्रती तास असा दाखवण्यात आला. त्यामुळे मिचेल स्टार्कने शोएब अख्तरचा विक्रम मोडल्याचा हा दावा खोटा आहे.

advertisement

टीम इंडियाची बॅटिंग गडगडली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत फुलांना सोन्याचं मोलं, शेवंती, झेंडू खायोत भाव, गुलाबाचा दर काय?
सर्व पहा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्यात पावसाने बराच व्यत्यय आणला, त्यामुळे सामना 26 ओव्हरचाच झाला. 7 महिन्यांनंतर टीम इंडियात कमबॅक करणारे रोहित शर्मा आणि विराट कोहली अपयशी ठरले. रोहित 8 रनवर तर विराट शून्य रनवर आऊट झाला. मिचेल स्टार्कने विराटची विकेट घेतली, यानंतर शुभमन गिल 10 रनवर आणि श्रेयस अय्यर 11 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : स्टार्कचा रोहितला 176.5 च्या स्पीडने बॉल! शोएब अख्तरचं रेकॉर्ड मोडलं? सत्य अखेर समोर आलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल