India vs Australia 1st Odi : पर्थमध्ये सूरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली आहे. खरं तर पावसामुळेच हा खेळ अनेकदा थांबला, त्यामुळे 26 ओव्हरचा सामना झाला. यामध्ये टीम इंडियाने फक्त 136 धावाच करू शकली.त्यातल्या त्यात भारत शेवटच्या 9 धावा काढताना 4 विकेट गमावून बसला होता.पण नितीश रेड्डीमुळे भारताला ऑल आऊटचा धोका टळला.
advertisement
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती.टीम इंडियाची सुरूवात खूपच खराब झाली होती. कारण 7 महिन्यांनी मैदानात वापसी करणारा रोहित शर्मा अवघ्या 8 धावांवर बाद झाला. त्याच्या मागोमाग विराट कोहली मैदानात आला. पण तो देशील शून्य धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार शुभमन गिल 10 धावांवर बाद झाला.
तीन महत्वाचे विकेट पडल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना मोठ्या धावा करता आल्या नाही.श्रेयस अय्यर 11वर गेला. तर अक्षरने 31 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर 10 धावांवर बाद झाला. सुंदर ज्यावेळेस बाद झाला तेव्हा भारताच्या 115 धावांवर 7 विकेट होत्या. त्याच्यानंतर एकामागून एक विकेटची रांगच लागली. भारताने यावेळेस अवघ्या 9 धावात 4 विकेट गमावल्या. या दरम्यान भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने केल्या. राहुलने 38 धावांवर बाद झाला. त्यानंतर हर्षित राणा आणि अर्शदिपची विकेट पडली.
शेवटच्या क्षणी नितीश रेड्डी क्रिजवर उभा राहिला म्हणून भारतावरचं ऑलआऊट संकट टळलं आणि त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स मारून भारताचा डाव 136 पर्यत नेला. आता ऑस्ट्रेलियासमोर डीएलएस मेथडनुसार 131 धावांचे आव्हान असणार आहे.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (विकेटकीपर), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिशेल ओवेन, मिशेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
वनडे मालिका
१९ ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ
२३ ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड
२५ ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन