नॅथन एलिसने स्लो बॉलवर अभिषेक शर्माची विकेट घेतली. नॅथन एलिसने टाकलेला स्लो बॉल अभिषेक शर्माला समजला नाही आणि त्याने आधीच बॅट उचलली, त्यामुळे बॉल मिड ऑफच्या दिशेने हवेत गेला आणि टीम डेव्हिडने त्याचा कॅच पकडला. चौथ्या ओव्हरच्या पाचव्या बॉलला अभिषेकने त्याची विकेट गमावली, पण त्याआधी चौथ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला नॅथन एलिसने तसाच बॉल टाकला होता. एलिसने टाकलेला स्लो बॉल गिलला समजला आणि त्याने फोर मारली, यानंतर पुढच्या बॉलला गिलने एक रन काढून अभिषेकला स्ट्राईक दिला, पण याच बॉलला ऑस्ट्रेलियाला पहिली विकेट मिळाली.
advertisement
पावसाचा व्यत्यय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. पावसामुळे दोन वेळा मॅच थांबवण्यात आली. पाऊस थांबल्यानंतर मॅच सुरू झाली, तेव्हा सामना 18 ओव्हरचा करण्यात आला. यानंतर भारताने 9.4 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून 97 रन केले, यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली. पाऊस आला तेव्हा शुभमन गिल 20 बॉलमध्ये 37 तर सूर्यकुमार यादव 24 बॉलमध्ये 39 रनवर खेळत होते.
अर्शदीप बेंचवर, हर्षितला संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला बेंचवर बसवलं आहे, तर त्याच्याऐवजी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. भारतीय टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हर्षित राणा आठव्या क्रमांकावर बॅटिंग करू शकतो, त्यामुळे त्याला संधी दिल्याचं सांगण्यात येत आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्सर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
