अशा वेळी मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट महिलांसाठी स्वस्त आणि आकर्षक पर्याय ठरतं आहे. येथे फक्त 250 रुपयांमध्ये एक बॅग आणि 500 रुपयांमध्ये दोन बॅग्स मिळतात. या बॅग्स साधारणतः 700 ते 800 रुपयांपासून मिळतात, पण इथे त्याच डिझाईन्स आणि क्वालिटी अगदी परवडणाऱ्या दरात मिळतात.
advertisement
इथल्या बॅग्सच्या प्रकारांमध्ये विविधता पाहायला मिळते
टोट बॅग्स (Tote Bags): ऑफिस आणि मीटिंगसाठी योग्य; यात लॅपटॉप किंवा फाईल सहज ठेवता येते.
स्लिंग बॅग्स (Sling Bags): दैनंदिन वापरासाठी आणि कॅज्युअल आउटिंगसाठी उत्तम पर्याय.
हँडबॅग्स: फॉर्मल आणि प्रोफेशनल लूकसाठी योग्य.
मिनी बॅकपॅक (Mini Backpack): कॉलेज, ट्रॅव्हल किंवा विकेंड ट्रिपसाठी आकर्षक पर्याय.
सॅटचेल बॅग (Satchel Bag): फॅशन आणि फंक्शन दोन्ही मिळवून देणारी क्लासिक बॅग.
या बॅग्स लेदर लूक, फॅब्रिक बेस्ड, कलरफुल प्रिंट्स अशा अनेक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. दर्जेदार मटेरियल, परवडणारा दर आणि ट्रेंडिंग लूक या तिन्हींचा संगम क्रॉफर्ड मार्केटमधल्या या कलेक्शनमध्ये दिसतो.





