Mumbai Market : स्टायलिश अन् आकर्षक बॅग, मुंबईत इथं करा स्वस्तात खरेदी, प्रोफेशनल लूक दिसेल भारी, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट महिलांसाठी स्वस्त आणि आकर्षक पर्याय ठरतं आहे. येथे फक्त 250 रुपयांमध्ये एक बॅग आणि 500 रुपयांमध्ये दोन बॅग्स मिळतात.
मुंबई : स्टाईल आणि वापर दोन्हीचा उत्तम मिलाफ असलेली बॅग ही प्रत्येक मुलीच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. मग ती ऑफिसला जाणारी असो, कॉलेजला जाणारी असो किंवा विकेंडला शॉपिंगला जाणारी. प्रत्येक प्रसंगानुसार वेगवेगळी बॅग असावी अशी इच्छा अनेकांची असते आणि त्यामुळेच ‘स्वस्तात मस्त बॅग कुठे मिळेल?’ हा प्रश्न कायम मनात असतो. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलींसाठी बॅग ही केवळ वस्तू ठेवण्याचं साधन नसून त्यांच्या लूकचा एक महत्त्वाचा भाग असतो. ऑफिससाठी एक वेगळी बॅग, फॅशन इव्हेंटसाठी छोटी बॅग, तर मीटिंगसाठी फॉर्मल हँडबॅग असं प्रत्येकाचं स्वतःचं कलेक्शन तयार असतं.
अशा वेळी मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट महिलांसाठी स्वस्त आणि आकर्षक पर्याय ठरतं आहे. येथे फक्त 250 रुपयांमध्ये एक बॅग आणि 500 रुपयांमध्ये दोन बॅग्स मिळतात. या बॅग्स साधारणतः 700 ते 800 रुपयांपासून मिळतात, पण इथे त्याच डिझाईन्स आणि क्वालिटी अगदी परवडणाऱ्या दरात मिळतात.
advertisement
इथल्या बॅग्सच्या प्रकारांमध्ये विविधता पाहायला मिळते
टोट बॅग्स (Tote Bags): ऑफिस आणि मीटिंगसाठी योग्य; यात लॅपटॉप किंवा फाईल सहज ठेवता येते.
स्लिंग बॅग्स (Sling Bags): दैनंदिन वापरासाठी आणि कॅज्युअल आउटिंगसाठी उत्तम पर्याय.
हँडबॅग्स: फॉर्मल आणि प्रोफेशनल लूकसाठी योग्य.
मिनी बॅकपॅक (Mini Backpack): कॉलेज, ट्रॅव्हल किंवा विकेंड ट्रिपसाठी आकर्षक पर्याय.
सॅटचेल बॅग (Satchel Bag): फॅशन आणि फंक्शन दोन्ही मिळवून देणारी क्लासिक बॅग.
advertisement
या बॅग्स लेदर लूक, फॅब्रिक बेस्ड, कलरफुल प्रिंट्स अशा अनेक डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत. दर्जेदार मटेरियल, परवडणारा दर आणि ट्रेंडिंग लूक या तिन्हींचा संगम क्रॉफर्ड मार्केटमधल्या या कलेक्शनमध्ये दिसतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 4:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mumbai Market : स्टायलिश अन् आकर्षक बॅग, मुंबईत इथं करा स्वस्तात खरेदी, प्रोफेशनल लूक दिसेल भारी, Video

