Honda 0 Alpha: महिंद्रा आणि Tata ला भिडणार, Honda आणतेय हायटेक SUV, पहिल्यांदाच PHOTOS समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
जपानीज कंपनी होंडाने आता ईलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आणखी एक दमदार अशी कन्सेप्ट एसयूव्ही आणली आहे.
जपानीज कंपनी होंडाने आता ईलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आणखी एक दमदार अशी कन्सेप्ट एसयूव्ही आणली आहे. Japan Mobility Show 2025 मध्ये होंडा कंपनीने नवीन इलेक्ट्रिक SUV Honda 0 α (Alpha) ची झलक दाखवली आहे. कंपनीची ही एक 0 सीरीज EV लाईनअपवर तयार झालेली पहिली कार आहे. तर भारतात लवकरच लाँच होणारी ही पहिली होंडाची इलेक्ट्रिक SUV आहे. विशेष म्हणजे, Honda 0 α ही भारतात तयार केली जाणार आहे आणि 2027 च्या सुरुवातीला भारतात लाँच होणार आहे.
advertisement
Honda 0 α Alpha ची डिझाईनही वेगळी आणि युनिक आहे. यामध्ये Thin, Light आणि Wise वर तयार केली आहे. ही कार एक 0 सीरीजची गेटवे मॉडेल असल्याचं सांगितलं जात आहे. ही एसयूव्ही होंडाने ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन तयार केली आहे. त्यामुळेच स्टायलिश, प्रॅक्टिकल आणि फ्यूचरिस्टिक इलेक्ट्रिक SUV असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
advertisement
advertisement
Honda 0 α Alpha चं केबिन होंडाच्या Thin पॅकेजिंग फिलॉसॉफीवर आधारित आहे. यात एक विशाल (स्पेशियस) आणि टेक-फोकस्ड इंटीरियर मिळेल. कंपनीने अजून पूर्ण माहिती दिली नाही, पण प्रोडक्शन व्हर्जनमध्ये फ्लॅट फ्लोअर, अ‍ॅडव्हान्स्ड कनेक्टेड सिस्टीम आणि सेफ्टी व कम्फर्टचे अनेक हाय-टेक फीचर्स दिले जातील.
advertisement
भारतात कधी होणार लाँच? Honda 0 α Alpha ही भारतातच तयार केली जाणार असून होंडाच्या Elevate EV प्रोजेक्टची जागा घेईल. कंपनी ही फ्रंट-व्हील-ड्राइव्ह (Front-Wheel-Drive) लेआउटसह सादर करू शकते. लॉन्च झाल्यानंतर ही SUV Mahindra BE 6, Tata Curvv EV, Hyundai Creta Electric, आणि Maruti Suzuki eVitara यांसारख्या गाड्यांना थेट टक्कर देईल.
advertisement


