पनवेलमध्ये फार्महाऊस कांड, वॉशरूममध्ये 'स्पाय कॅम', महिलांच्या Video ने मालकाची हार्ड डिस्क भरली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच पनवेलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलमधील तळोजा भागातील एका फार्महाऊसच्या वॉशरूममध्ये एक छुपा कॅमेरा सापडला आहे.
पनवेल : महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच पनवेलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेलमधील तळोजा भागातील एका फार्महाऊसच्या वॉशरूममध्ये एक छुपा कॅमेरा सापडला आहे. धन सागर गावामधील रियांश फार्महाऊसमध्ये एका महिला गेस्टला वॉशरूम वापरताना काहीतरी संशयास्पद आढळले, त्यामुळे तिने अधिक तपास केला तेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी छुपा कॅमेरा ठेवला असल्याचं दिला दिसलं.
यानंतर महिलेने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी महिलांचे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड करणारा फार्महाऊसचा मालक मनोज चौधरी याला अटक केली आहे. चौधरीच्या मोबाईलमध्ये असे अनेक व्हिडिओ सापडले आहेत, तसंच त्याने हे व्हिडिओ शेअरही केले आहेत, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी फार्महाऊसच्या मॅनेजरविरुद्ध निष्काळजीपणा तसंच घटनेत सहभागी असल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
मालकाच्या फोनमध्ये घबाड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका कुटुंबाने फार्महाऊस काही काळासाठी भाड्याने घेतले होते, तेव्हा महिलेला वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा दिसला. तसंच महिलेने फार्महाऊसचा मालक चौधरीला त्याच्या फोनवर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ पाहताना पकडले. यानंतर महिलेने ताबडतोब तिच्या कुटुंबाला घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलं आणि त्यांनी पोलिसांना संपर्क केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौधरीला अटक केली.
advertisement
फार्महाऊस मालक मनोज चौधरी याच्या मोबाईलमध्ये असे किती व्हिडिओ आहेत आणि त्याने हे व्हिडिओ कुणाकुणाला पाठवले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. तसंच याप्रकरणी कठोरातली कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
view commentsLocation :
Panvel,Raigad,Maharashtra
First Published :
October 29, 2025 6:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पनवेलमध्ये फार्महाऊस कांड, वॉशरूममध्ये 'स्पाय कॅम', महिलांच्या Video ने मालकाची हार्ड डिस्क भरली!


