दुबईप्रमाणे टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये 4 स्पिनरना घेऊन खेळण्याचा विचार करणार नाही, पण स्पिनरची भूमिका महत्त्वाची असेल, असे संकेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दिले आहेत.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
'टीममध्ये फारसा बदल झालेला नाही. मागच्या वेळी आम्ही दक्षिण आफ्रिकेत गेलो होतो, तेव्हा एक फास्ट बॉलर, एक ऑलराऊंडर आणि तीन स्पिनर घेऊन खेळलो होतो. इथली परिस्थिती सारखीच आहे', असं सूर्यकुमार यादव म्हणाला. सूर्यकुमार यादवने दिलेल्या या संकेतांमुळे पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडिया अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासह मैदानात उतरू शकते. याशिवाय वॉशिंगटन सुंदरचा पर्यायही उपलब्ध आहे.
advertisement
मॅच विनरला स्थान नाही
वनडे सीरिजसाठी विश्रांती देण्यात आलेला जसप्रीत बुमराह टी-20 सीरिजसाठी कमबॅक करत आहे. बुमराहसोबत डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग बॉलिंगची सुरूवात करेल. तर ऑलराऊंडर शिवम दुबे तिसरा फास्ट बॉलर असेल. सिडनीमध्ये झालेल्या शेवटच्या वनडेमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या हर्षित राणाला त्यामुळे बाहेर बसावं लागू शकतं. बॅटिंगमध्ये मात्र फार बदल व्हायची शक्यता कमी आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
