सूर्यकुमार यादवने 86 इनिंगमध्ये 1,649 बॉल खेळून टी-20 फॉरमॅटमध्ये 150 सिक्स मारल्या आहेत. इतक्या जलद सिक्स मारणारा सूर्या हा जगातला दुसरा खेळाडू ठरला आहे. युएईच्या मुहम्मद वसीम या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मुहम्मद वसीमने 66 इनिंग आणि 1543 बॉलमध्ये 150 सिक्सचा टप्पा गाठला होता.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. 2007 साली टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या रोहितने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमध्ये 205 सिक्स लगावल्या आहेत, पण त्यालाही सगळ्यात जलद 150 सिक्सचा टप्पा गाठता आला नाही, जो सूर्यकुमार यादवने 4 वर्षांमध्ये गाठला. सूर्यकुमार यादवने 2021 साली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्याच्या पहिल्याच बॉलला सूर्याने जोफ्रा आर्चरला सिक्स मारून करिअरची दणक्यात सुरूवात केली.
advertisement
सूर्यकुमार यादवने 91 टी-20 सामन्यांमध्ये 37.63 ची सरासरी आणि 164.19 च्या स्ट्राईक रेटने 2709 रन केले आहेत, यात 4 शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 150 पेक्षा जास्त सिक्स मारणारे खेळाडू
रोहित शर्मा- 205 सिक्स
मुहम्मद वसीम- 187 सिक्स
मार्टिन गप्टील- 173 सिक्स
जॉस बटलर- 172 सिक्स
सूर्यकुमार यादव- 150 सिक्स
