नितीश रेड्डी पहिल्या तीन टी-ट्वेंटी सामन्यातून बाहेर
भारताचा युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी पहिल्या तीन टी-ट्वेंटी सामन्यातून बाहेर पडल्याची माहिती बीसीसीआयने ट्विट करत दिली आहे. नितीश कुमार रेड्डी याला अॅडलेडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान डाव्या क्वाड्रिसेप्सची दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरत असताना नितीशला आणखी एका दुखापतीने ग्रासल्याचं पहायला मिळालं आहे.
advertisement
बीसीसीआयची वैद्यकीय टीम अॅक्शन मोडवर
सूर्यकुमार यादव पहिल्या टी-ट्वेंटीच्या टॉससाठी मैदानात आला अन् बीसीसीआयने ट्विट करत नितीश कुमार रेड्डीच्या दुखापतीवर भाष्य केलं. टी-ट्वेंटी मालिकेच्या सुरूवातीलाच नितीश कुमार रेड्डी याने मानेच्या दुखापतीची तक्रार केली आहे. ज्यामुळे नितीशच्या कमबॅकवर आणि हालचालीवर परिणाम झाला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, जोश फिलिप, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
