ऑस्ट्रेलियाला किती रनचं टार्गेट?
पावसामुळे आता भारताला पुन्हा बॅटिंग मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सामना पुन्हा सुरू झाला तर ऑस्ट्रेलियाला 5 ओव्हर बॅटिंगची संधी मिळेल आणि डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 5 ओव्हरमध्ये 71 रनचं आव्हान मिळेल. तसंच जर मॅच 6 ओव्हरची झाली तर ऑस्ट्रेलियाला 83 रनचं, मॅच 7 ओव्हरची झाली तर 95 रनचं, 8 ओव्हरची झाली तर 106 आणि 9 ओव्हरची झाली तर 117 रनचे टार्गेट मिळेल.
advertisement
आशिया कप विजयानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅट खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. या सामन्यात भारतीय टीम दोन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनरसह दोन ऑलराऊंडरना घेऊन मैदानात उतरली आहे. फास्ट बॉलिंगची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा यांच्यावर आहे. तर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोन स्पेशलिस्ट स्पिनर आहेत. याशिवाय अक्षर पटेल आणि शिवम दुबे या ऑलराऊंडरनाही बॉलिंग करावी लागणार आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्सर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
