रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरणार आहे, कारण पुढच्या 2 वर्षांमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये जाणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला हा शेवटचा सामना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कायम आठवणीत राहील असा खेळला. या सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा इमोशनल झाले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियामधल्या प्रेक्षकांचे आभार मानले.
advertisement
'आम्ही दोघं पुन्हा कधी ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला येऊ का नाही, माहिती नाही, पण ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळताना आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय केला' असं रोहित शर्मा म्हणाला आहे. 'मला इकडे यायला कायमच आवडतं, मी ऑस्ट्रेलियामध्ये आणि खासकरून सिडनीमध्ये क्रिकेट खेळणं एन्जॉय करतो. 2008 च्या माझ्या इथल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, तो माझा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता. पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळायला येऊ का माहिती नाही, पण मी इथल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला', अशी प्रतिक्रिया रोहितने दिली आहे.
'मागच्या 15 वर्षात काय झालं, हे विसरून जा, पण मला इकडे खेळायला कायमच आवडलं, विराटचीही हीच भावना आहे. ऑस्ट्रेलियाचे धन्यवाद', रोहितच्या या वक्तव्यानंतर स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक भावनिक झाले आणि त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये रोहित आणि विराटचं कौतुक केलं.
काय म्हणाला विराट?
'तुम्ही कितीही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला असाल, पण खेळ तुम्हाला कायम शिकवतो. पुढच्या काही दिवसात मी 37 वर्षांचा होईन, पण आव्हानाचा पाठलाग करताना माझा खेळ कायम उत्कृष्ट होतो. मी आणि रोहित सगळ्यात अनुभवी जोडी आहोत, लहान असल्यापासूनच मोठी पार्टनरशीप करून मॅच जिंकवू शकतो, हे आम्हाला माहिती होतं. 2013 पासून याला सुरूवात झाली. आम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये येऊन खेळायला आवडतं, आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो. मोठ्या संख्येने इकडे येऊन आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल अभिनंदन', असं विराट कोहली म्हणाला आहे.
