वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंगवर मॅथ्यू शॉर्टने गुडघा टेकवून स्क्वेअर लेगच्या दिशेने स्वीप शॉट मारला, पण बॉल हवेत गेला आणि विराटने उत्कृष्ट कॅच पकडला. मॅथ्यू शॉर्टने 41 बॉलमध्ये 30 रनची खेळी केली. वॉशिंग्टन सुंदरची या सामन्यातली ही पहिली विकेट होती, तर ऑस्ट्रेलियाने 124 रनवर तिसरी विकेट गमावली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारतीय बॉलर्सनी अचूक बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाचा 46.4 ओव्हरमध्ये 236 रनवर ऑलआऊट केला. हर्षित राणाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, याशिवाय वॉशिंग्टन सुंदरला 2 विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. ऑस्ट्रेलियाकडून रेनशॉने सर्वाधिक 56 रनची खेळी केली, तर मिचेल मार्शने 41 रन केले.
advertisement
टीम इंडियाने सीरिज गमावली
पर्थ आणि ऍडलेडमधील पराभवानंतर भारताने ही सीरिज आधीच गमावली आहे. तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाने फास्ट बॉलर अर्शदीप सिंग आणि ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी यांच्याऐवजी कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी दिली. तर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला. झेवियर बार्टलेटऐवजी नॅथन एलिसचा टीममध्ये समावेश केला गेला.
भारताची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, एलेक्स कॅरी, कुपर कोनली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, एडम झम्पा, जॉश हेजलवूड
