भारताने आतापर्यंत 211 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मंगळवारी जेव्हा भारतीय संघ गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा तो त्यांचा 212 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. भारताने आतापर्यंत 211 पैकी 135 टी-20 सामने जिंकले आहेत. पाकिस्ताननेही भारताच्या बरोबरीने 135 सामने जिंकले आहेत. मात्र, पाकिस्तानने तुलनेत भारतापेक्षा 15 जास्त टी 20 सामने खेळले आहेत.
advertisement
IPL 2024 : मुंबई-गुजरात-मुंबई; हार्दिक पंड्याच्या 'रिटर्न जर्नी' ची ही महत्त्वाची कारणं
जर टीम इंडिया गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवला जाणारा टी 20 सामना टीम इंडियाने जिंकला तर हा टी 20 क्रिकेटमधील त्यांचा 136 वा विजय असेल. अशा प्रकारे टीम इंडियाला पाकिस्तानला मागे सोडण्याची चांगली संधी आहे. सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 200 पैकी 102 टी-20 सामने जिंकले आहेत. तर सर्वाधिक विजयांच्या यादीत दक्षिण आफ्रिका 95 सामन्यांसह चौथ्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया 94 सामन्यांसह पाचव्या तर इंग्लंड 92 सामन्यांसह सहाव्या स्थानावर आहे.
जर भारत गुवाहाटीमध्ये नाही जिंकला तरी पुढील दोन सामन्यात विजय प्राप्त करून ते हा रेकॉर्ड नावावर करू शकतात. गुवाहाटीनंतर टीम इंडियाला 1 डिसेंबरला रायपूर आणि 3 डिसेंबरला बेंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 सामने खेळायचे आहेत. यातील एक जरी सामना टीम इंडियाने जिंकला तरी भारत पाकिस्तानला मागे सोडेल.