वनडे सीरिज संपल्यानंतर आता विराट आणि रोहित ऑस्ट्रेलियातून निघणार आहेत, पण आता दोन्ही खेळाडू पुन्हा मैदानात कधी उतरणार? याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. विराट आणि रोहितची बॅटिंग पाहण्यासाठी फॅन्सना फार वाट पाहावी लागणार नाही. आता तर विराट कोहली आणि रोहित शर्मा आता भारतीय मैदानातच धमाका करणार आहेत.
पुढच्या महिन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या वनडे सीरिजला सुरूवात होत आहे. या सीरिजमध्ये विराट आणि रोहित टीम इंडियाकडून खेळताना दिसतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया 5 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे, यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. ही सीरिज संपल्यानंतर 30 नोव्हेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 वनडे मॅचची सीरिज खेळवली जाईल.
advertisement
भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे, 30 नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे, 3 डिसेंबर, रायपूर
तिसरी वनडे, 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
दक्षिण आफ्रिकेच्या वनडे सीरिजनंतर न्यूझीलंडची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे, तेव्हा दोन्ही टीममध्ये 3 वनडे मॅचची सीरिज होईल. या सीरिजमध्येही विराट-रोहितला खेळताना पाहण्याची संधी भारतीय क्रिकेट फॅन्सना मिळणार आहे.
भारत-न्यूझीलंड वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे, 11 जानेवारी, बडोदा
दुसरी वनडे, 14 जानेवारी, राजकोट
तिसरी वनडे, 18 जानेवारी, इंदूर
विराट-रोहित विजय हजारे ट्रॉफीही खेळणार?
दरम्यान दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 24 डिसेंबरपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. रोहित आणि विराट टेस्ट तसंच टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेत, तसंच टीम इंडिया पुढच्या काळात फार वनडे मॅच खेळणार नाही, त्यामुळे विराट-रोहित मॅच प्रॅक्टिससाठी विजय हजारे ट्रॉफी खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
