Rohit Sharma News: ऑस्ट्रेलिया विरूद्धची वनडे मालिका भारताने 2-1 ने गमावली आहे. जरी भारताने ही मालिका गमावली असली तरी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने चांगलं पुनरागमन केलं. आता हे दोन्ही खेळाडू पुन्हा नोव्हेंबरमध्ये खेळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात हे दोन्ही खेळाडू मैदानात उतरणार आहेत. खरं तर रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ज्याप्रमाणे आपल्या फिटनेसवर काम केलं. वजन घटवलं,डाएट केलं आणि मैदानात कसून सराव केला. याचं फळ त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळालं.आता अशाचप्रकारे रोहित शर्मा साऊथ आफ्रिका दौऱ्याआधी करणार आहे. त्यामुळे रोहितच आणखी वजन कमी झालं तर नवल वाटायला नको, असे अभिषेक नायर म्हणाला आहे.त्यामुळे रोहित शर्माचं हे सीक्रेट त्याचा प्रशिक्षक मित्र अभिषेक नायरने फोडलं आहे. त्यामुळे रोहितचा नेमका मास्टरप्लान काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
गेल्या तीन महिन्यांत रोहितने 11 किलो वजन कमी केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान त्याचे बदल स्पष्टपणे दिसून आले. तो पूर्वीपेक्षा सडपातळ झाला आहे. रोहितने ऑस्ट्रेलियात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले, ज्यामुळे हे दिसून येते की त्याला शेवटचे स्पर्धात्मक क्रिकेट खेळून सात महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी त्याची लय अबाधित आहे. त्याने त्याच्या फिटनेसमध्ये लक्षणीय बदल केले आहेत. आता रोहित शर्मा थेट साऊथ आफ्रिकेसोबत खेळताना दिसणार आहे.या दौऱ्याबाबत अभिषेक नायर म्हणतो की, रोहितचा वजन कमी करण्याचा प्रवास भारताच्या पुढील घरच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी सुरू राहू शकतो.याचाच अर्थ रोहित साऊथ आफ्रिके दौऱ्याआधी आणखी वजन कमी करण्याची शक्यता आहे.
14 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणखी काही किलो वजन कमी करू शकतो,असे अभिषेक नायर सामन्यानंतर जिओस्टारशी बोलताना म्हणाला आहे. भारताला परतताना रोहित शर्माला नक्कीच आराम वाटत असेल. त्याने त्याचे आवडते अन्न सोडले आहे. त्याचे परिणाम दिसत आहेत. पुढची मालिका एका महिन्यात आहे आणि तोपर्यंत त्याने आणखी काही किलो वजन कमी केले तर आश्चर्य वाटणार नाही,असे देखील त्याने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक धावा
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 101 च्या स्ट्राईक रेटने 202 धावा केल्या ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. रोहितने अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 73 आणि सिडनीतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 121 धावा केल्या.
रोहित शर्माने ज्या प्रकारे वजन घटवून ही कामगिरी केली आहे, ती पाहता जर त्याने आणखी वजन कमी केलं तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात काही खरं नाही. आता रोहितकडे फक्त एक महिन्याचा कालावधी उरला आहे.या कालावधीत तो किती वजन कमी करतो? हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान भारतीय संघ 30 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना धोनीच्या मूळ गावी, रांची येथे खेळला जाणार आहे. या मालिकेची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
