शुभमन गिलला ऑस्ट्रेलियात अपयश
सिरीजमध्ये शुभमन गिलला मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. पहिल्या दोन मॅचमध्ये त्याचा स्कोअर खूपच कमी राहिला. पहिल्या वनडे सामन्यात शुभमन 10 आणि दुसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिल 9 धावा करून बाद झाला. तर तिसऱ्या वनडे सामन्यात शुभमनने 24 धावा केल्या. चांगली सुरूवात मिळून देखील शुभमनला मोठा स्कोर उभा करता आला नाही. अशातच आता शुभमनचं टी-ट्वेंटी संघातलं स्थान धोक्यात आलंय.
advertisement
तीन वनडेमध्ये केवळ 44 धावा
ऑस्ट्रेलियाच्या पीचवर शुभमन गिलची बॅट चालत नसल्याचं पहायला मिळतंय. तीन वनडेमध्ये त्याने केवळ 44 धावा केल्या आहेत. तर टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये देखील शुभमनला चांगली खेळी करता आली नाही. आशिया कपच्या फायनलमध्ये देखील शुभमन गिलचा चांगली कामगिरी करता आली नव्हती. तो फक्त 12 धावा करून आऊट झाला होता. तर त्याआधी श्रीलंकेविरुद्ध त्याला फक्त 4 धावा करता आल्या होत्या. तसेच बांगलादेशविरुद्ध 29 तर पाकिस्तानविरुद्ध 47 केल्या होत्या. तसेच ओमानविरुद्ध शुभमन 5 रनवर आऊट झाला होता.
शुभमनचं ऑस्ट्रेलियातून पॅकअप होणार?
दरम्यान, टी-ट्वेंटीमध्ये सूर्यकुमारसमोर प्लेइंग इलेव्हन निवडण्याचं मोठं आव्हान आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा असताना सूर्यकुमारला शुभमन गिलला खेळवावं लागत आहे. अशातच आता संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यासह सूर्या प्लेइंग इलेव्हनमध्ये उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शुभमन गिलचं रोहित आणि विराटसह ऑस्ट्रेलियातून पॅकअप होणार का? असा सवाल विचारला जात आहे. शुभमन टी-ट्वेंटी मालिकेत व्हाईस कॅप्टन असल्याने गौतमला गंभीर विचार करावा लागेल.
टी-ट्वेंटी मालिकेसाठी टीम इंडिया -
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (व्हाईस कॅप्टन), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर.
