टीम इंडियाचा सलामीवर शुभमन गिल आणि अभिषेक शर्माने चांगली सूरूवात केली होती. दोघांनी 77 धावांपर्यंत नाबाद फटकेबाजी केली होती.त्यानंतर शुभमन गिल 29 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर शिवम दुबे मैदानात आला होता. पण तो देखील 2 धावा करून बाद झाला.त्यानंतर मैदानात कर्णधार सुर्यकुमार यादवची एंन्ट्री झाली होती. भारताचे एका मागुन एक विकेट पडत असतान दुसरीकडुन अभिषेक शर्माची फटकेबाजी सूरूच होती. अभिषेक शर्मा अवघ्या 40 ते45 बॉलमध्ये शतक ठोकेल असे वाटत असताना मोठा घात झाला.
advertisement
त्याचं झालं असं की सुर्या स्ट्राईकवर असताना त्याने विकेट मागे कट मारला आणि नॉन स्ट्राईक एंडवरून धावत सुटला.पण खेळाडूने बॉल पकडल्याचे पाहून सूर्याने त्याला नकार दिला.तिथपर्यंत अर्ध्या क्रिजपर्यंत अभिषेक आला होता. पण खेळाडूने नॉन स्ट्राईकवर बॉल टाकून त्याला रनआऊट केले.त्यामुळे अभिषेक शर्मा 37 बॉलमध्ये 75 धावा करून बाद झाला.या खेळीत त्याने 5 षटकार आणि 6 चौकार लगावले होते.
अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर सुर्याने देखील विकेट फेकली होती,सुर्याच्या बॅटीला कड लागून बॉल थेट विकेटच्या हातात गेला होता.त्यामुळे अभिषेक शर्माला रनआऊट करून आणि सुर्याने स्वत:विकेट फेकून पायावर धोंडा मारला होता. दरम्यान सुर्या बाद झाल्यानंतर तिलक वर्मा देखील 5 धावांवर बाद झाला आहे.त्यामुळे भारताचा डाव गडगडला आहे.
सध्या भारताने 5 विकेट गमावून 150 धावा केल्या आहेत. हार्दिक पांडया आणि अक्षर पटेल मैदानावर खेळत आहेत.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन):
सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसेन इमोन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, जाकेर अली (कर्णधार-विकेटकीपर), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तनझिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान
भारत (प्लेइंग इलेव्हन):
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती