TRENDING:

IND vs BAN : टॉस हरल्यानंतर सुर्याच्या मनातलं घडलं, भारताची प्लेइंग इलेव्हन काय बदलं? बांग्लादेशचा कर्णधार बाहेर

Last Updated:

IND vs BAN, Asia Cup Super 4: बांग्लादेशच्या कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतल्याने सुर्याच्या मनातलं घडलं आहे. हा सामना टीम इंडियाला थेट फायनलमध्ये पोहोचवणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs BAN, Asia Cup Super 4
IND vs BAN, Asia Cup Super 4
advertisement

IND vs BAN, Asia Cup Super 4: आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात आज बांग्लादेशने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरणार आहे. खरं तर सुर्याला फलंदाजीच करायची पण तो टॉस हरला होता.पण बांग्लादेशच्या कर्णधाराने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतल्याने सुर्याच्या मनातलं घडलं आहे. हा सामना टीम इंडियाला थेट फायनलमध्ये पोहोचवणार आहे.त्यामुळे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी आहे? हे जाणून घेऊयात.

advertisement

बांग्लादेशचा कर्णधार लिंटन दास दुखापतग्रस्त असल्याने जेकर अली टॉससाठी यावेळी आला होता. यावेळी टॉस जिंकल्यानंतर जेकर अली म्हणाला, आम्हाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. सराव सत्रादरम्यान (लींटन दास) जखमी झाला आणि दुर्दैवाने तो या महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकणार नाही आहे,अशी त्याने माहिती दिली आहे.तसेच तो पुढे म्हणाला आम्ही या सामन्यासाठी उत्सुक आहोत.

advertisement

टॉस दरम्यान सुर्यकुमार यादव म्हणाला, आम्हाला फलंदाजी करायला आनंद होत आहे. गेल्या 4-5 सामन्यांमध्ये आम्हाला जे हवे होते ते मिळाले आहे आणि आम्ही प्रथम फलंदाजी करण्यास आनंदी आहोत. आम्ही करत असलेल्या चांगल्या गोष्टींचे पालन करावे लागेल आणि निकाल स्वतःच दिसतील,असे त्याने सांगितले आहे.

advertisement

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन):

सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसेन इमोन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, जाकेर अली (कर्णधार-विकेटकीपर), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तनझिम हसन साकिब, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान

advertisement

भारत (प्लेइंग इलेव्हन):

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs BAN : टॉस हरल्यानंतर सुर्याच्या मनातलं घडलं, भारताची प्लेइंग इलेव्हन काय बदलं? बांग्लादेशचा कर्णधार बाहेर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल