खरं तर भारत बांग्लादेश यांच्यातील वादाचा परिणाम अंडर 19 वर्ल्डकपमध्येही पाहायला मिळाला. त्याचं झालं असं की टॉस दरम्यान दोन्ही देशाचे कर्णधार मैदानात उपस्थित होते. यावेळी भारताच्या आयुष म्हात्रेंने टॉस उंचावला. हा टॉस बांगलादेशचा कर्णधार अझिझुल हकीमने जिंकल्यानंतर त्याने आयुष म्हात्रेसोबत शेकहॅड करणे टाळले होते.त्यामुळे मैदानात मोठा राडा झाला होता.
या राड्यानंतर फलंदाजी आलेल्या वैभव सूर्यवंशीचा जवाद अबरारसोबत राडा झाला. जवाद अबरार आणि वैभव सूर्यवंशीमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. या वादा दरम्यान वैभव सूर्यवंशी जवाद अबरारला बोट दाखवून वॉर्निंग देताना दिसला आहे.त्यामुळे या सामन्यात भयंकर राडा झाला होता.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर प्रथम फलंदाजी करताना भारताची सूरूवात चांगली झाली नव्हती. भारताकडून सलामीला उतरलेला आयुश म्हात्रे 6 वर बाद झाला. त्यानंतर वेदांत त्रिवेदी शुन्यावर आणि विहान मल्होत्रा 7 वर बाद झाला. भारताचे एकामागून एक विकेट पडत असताना वैभव सूर्यवंशी आणि अभिग्यान कंडूने भारताचा डाव सावरला होता.
वैभव सूर्यवंशीन यावेळी 67 बॉलमध्ये 72 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 6 चौकार लगावले होते. त्यानंतर हरवांश पंगालिया 2 धावावर बाद झाला. या सामन्यादरम्यात आता पाऊस पडल्याने खेळ थांबला आहे. या दरम्यान अभिग्यान कुंडू 63 तर आर अम्ब्रीश 4 वर खेळतो आहे.
