India vs Bangladesh Semi Final : एसीसी मेन्स रायझिंग स्टार आशिया कपच्या फायनल सामन्यात बांगलादेशने सूपर ओव्हरमध्ये एकही धाव न करता सामना जिंकला आहे. या विजयानंतर बांगलादेश फायनलमध्ये पोहोचली आहे. तर टीम इंडियाच या स्पर्धेतील आव्हान संपूष्ठात आलं आहे. दरम्यान भारताच्या या पराभवानंतर वैभव सूर्यवंशीला सूपर ओव्हरमध्ये फलंदाजीला का नाही पाठवलं? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर आता कर्णधार जितेश शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
सामन्यानंतर बोलताना कर्णधार जितेश शर्मान भारताच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत वैभव सूर्यवंशीला फलंदाजीसाठी न पाठवण्याचा कुणाचा निर्णय होता, याची देखील माहिती दिली आहे. खूपच चांगला खेळ झाला, आमच्यासाठी खूप शिकण्यासारखे होते. पण मी या पराभवाची जबाबदारी स्विकारतो.एक सिनिअर खेळाडू म्हणून मला सामना संपवायचा होता पण ते शक्य झालं नाही. आमच्यासाठी हा पराभव शिकण्यासारखा आणि अनुभवासारखा होता,असे जितेश शर्मा सांगतो.
माझा विकेट या सामन्याचा टर्निग पॉईंट होता. मला माहित होत अशा परिस्थितीत कशी फलंदाजी करतात.पण बांग्लादेशने चांगली गोलंदाजी केली. ज्या रिपोन मंडोलने सुपर ओव्हर टाकली त्याला या संपूर्ण विजयाचे श्रेय जाते,असे देखील जितेश शर्माने सांगितले.संपूर्ण 20 ओव्हर आम्ही कंट्रोलमध्ये होतो. यामध्ये कोणालाही दोष देऊ नका. हा एक चांगला खेळ आहे, बस्स. ते पॉवरप्लेचे मास्टर आहेत,असे शर्मा म्हणाला.
वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये का पाठवलं नाही?यावर बोलताना जितेश शर्मा म्हणाला, शेवटच्या क्षणी (सुपर ओव्हर) मी, आशु आणि रमन हे मनाप्रमाणे फटके मारू शकतात. तर हा संघाचा निर्णय आणि माझा निर्णय होता,अशी कबुली जितेश शर्माने दिली आहे.त्यामुळे जितेश शर्माने घेतलेल्या या निर्णयामुळेच भारताचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला.
खरं भारत आणि बांग्लादेशचा सामना ड्रॉ झाल्यानंतर तो सूपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. त्यामुळे भारताला सेमी फायनल जिंकण्याची आणखी एक संधी चालून आली होती. पण भारताचा कोच सूनील जोशी यांच्या एका निर्णयाने भारताने हा सामना गमावला होता.त्यांचं झालं असं की सूपर ओव्हरमध्ये भारताकडून वैभव सुर्यवंशीला सलामीला पाठवण्याऐवजी कोच जोशीने त्याला बेंचवर बसवलं.त्याच्याऐवजी कर्णधार जितेश शर्मा आणि आशुतोष शर्माला फलंदाजीला पाठवले होते.
सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?
यावेळी सुपर ओव्हरमध्ये बांग्लादेशच्या रिपॉन मंडोलच्या पहिल्याच बॉलवर जितेश शर्मा क्लिन बोल्ड झाला.त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर आशुतोष शर्मा एक्स्ट्रा कव्हरवर बॉल मारल्यामुळे कॅच आऊट झाला होता.त्यामुळे भारताचा डाव संपला होता.कारण सुपर ओव्हरमध्ये दोन खेळाडू आऊट झाले की इनिंग संपते.त्यामुळे भारताने शून्य धावा केल्याने बांग्लादेशसमोर 1 धावांचे आव्हान होते.
बांग्लादेशला सूपर ओव्हर जिंकण्यासाठी एक धावाचे आव्हान होते. यावेळी भारताकडून सूयर्श शर्मा गोलंदाजीला आला होता.यावेळी त्याने पहिल्याच बॉलवर यासिर अलीची विकेट घेतली होती.त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर सुयशने वाईड टाकला आणि बांग्लादेशने एकही न धावा काढता वाईड बॉलमुळ मिळालेल्या एका धावाने हा सामना जिंकला. त्यामुळे भारताच्या आयपीएल स्टार खेळाडूंनी हातात आलेली संधी गमावली.त्यामुळे आता भारताचे आव्हान संपूष्ठात आले होते.
