खरं तर इंग्लंडविरूद्ध आज अतिरीक्त गोलंदाज खेळवण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने जेमीमा रॉड्रीक्सला बसवून रेणुका सिंह ठाकूरला संघात जागा दिली होती. पण ती या सामन्यात फारशी अशी कामगिरी करू शकली नाही. या सामन्यात रेणुका सिंहने 8 ओव्हर गोलंदाजी केली ज्यामध्ये तिने 37 धावा दिल्या. या दरम्यान तिला एकही विकेट मिळाली नाही. पण या सामन्यात इंग्लंडच्या शकतवीर खेळाडू आऊट करण्याची तिच्याकडे संधी होती. पण तिने कॅच सोडली होती.
advertisement
त्याचं झालं असं की सामन्याची 42 वी ओव्हर टाकायला रेणुका सिंह आली होती. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर रेणुका सिंहला हेथर नाईटला कॉट अॅड बोल्ड करण्याची संधी होती.पण तिच्या हातून कॅच सुटला होता.ज्यावेळेस तिने हा कॅच सोडवै त्यावेळेस हेथर नाईट 91 धावांवर खेळत होती.यानंतर ती 109 धावांवर रनआऊट झाली. त्यामुळे साधारण तिला 18 धावा अतिरीक्त काढता आल्या.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 288 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा या हेथर नाईटने केल्या. हेथर नाईटने 109 धावांची शतकीय खेळी केली. या खेळीत तिने 1 षटकार आणि 15 चौकार लगावले होते. या व्यतिरीक्त अॅमी जोन्सने 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या दोन्ही खेळाडूंच्या बळावर इंग्लंडने 288 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे आता भारतासमोर 289 धावांचे आव्हान असणार आहे. भारताकडून दिप्ती शर्माने 4 तर श्री चरणीने 2 विकेट गमावल्या होत्या.
भारताची प्लेइंग इलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (क), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : एमी जोन्स (wk), टॅमी ब्युमॉन्ट, हेदर नाइट, नॅट सायव्हर-ब्रंट (सी), सोफिया डंकले, एम्मा लॅम्ब, ॲलिस कॅप्सी, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल