तब्बल 24 लोकांचा मृत्यू
इंदौरमध्ये दूषित पाणी पिऊन एक दोन नव्हे तर तब्बल 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील भागीरथपुरा परिसर दूषित पिण्याच्या पाण्यामुळे उलट्या आणि अतिसाराच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. अशातच आता टीम इंडिया देखील इंदौरमध्ये असल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंनी अधिकची काळजी घेणं पसंत केलं. अशातच आता विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
advertisement
पाहा Video
विराट पाणी स्वत: घेऊन आला
विराट कोहली आता इंदौरमध्ये पोहोचला असून विराटने आपलं पाणी स्वत: घेऊन आला आहे. विराट कोहली हॉटेलमध्ये आपल्या पाण्याच्या बाटल्या घेऊन स्वत: पोहोचला. त्याच्या हातात एक बॅग दिसत आहे. ज्याच फक्त पाण्याच्या बाटल्या दिसत आहे. विराट कोहली फक्त एवियन (Evian) नेचुरल स्प्रिंग वॉटर पितो, ज्याची किंमत चार हजार रुपये लिटर आहे.
विराट कोहलीचा डाएट
दरम्यान, इंदौरमध्ये पिण्याच्या पाण्यासह टीम इंडिया खेळाडूंच्या आहाराकडंही विशेष लक्ष देतीये. विराट कोहलीच्या आहारात ग्रील्ड हिरव्या भाज्या, दक्षिण भारतीय पदार्थ आणि सूपचा समावेश आहे. शुभमन गिलच्या आहारात उकडलेले अंडे, हिरव्या भाज्या, मसूर, रायता आणि सूपचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्माच्या आहारात मसूर, भात, सॅलड, सूप, चीज, भाज्या, दही आणि फळे यांचा समावेश आहे.
