रविंद्र जडेजाने कॅच सोडला
टीम इंडियाचा बॉलर प्रसिद्ध कृष्णाला आज विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी अर्शदीप सिंगचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अशातच पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्याच बॉलवर अर्शदीप सिंगने हेन्री निकोल्सचा कॅच उडवला पण पॉईटला थांबलेल्या रविंद्र जडेजाने कॅच सोडला. तर चौथ्याच बॉलवर अर्शदीपने हेन्री निकोल्सच्या दांड्या उडवल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाने दबदबा मिळवला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील मॅच फिरली.
advertisement
टीम इंडियाला दुसरी विकेट मिळाली
अर्शदीपनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये नव्या बॉलने हर्षिदने देखील जादू दाखवली. हर्षितने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर डेव्हॉन कॉनवेची विकेट काढली. डेव्हॉन कॉनवेने स्लिपला उभ्या असलेल्या रोहितच्या हातात बॉल सोपवला अन् टीम इंडियाला दुसरी विकेट मिळाली. अशाप्रकारे प्रेक्षक मैदानात सेट होत नाहीत तोवर टीम इंडियाने दोन विकेट्स नावावर केल्या.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन - डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, काइल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेडन लेनोक्स.
