समोर गौतम गंभीर आल्यानंतर विराट कोहली त्याच्यापासून लांब झाला आणि त्याच्याकडे न पाहताच पुढे निघून गेला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. टीम इंडियामधलं वातावरण सध्या चांगलं नसल्याच्या कमेंटही चाहते करत आहेत.
'विराट-रोहित आणि गंभीरमध्ये वाद नाहीत'
टीम इंडियाचा बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी मात्र विराट आणि रोहित यांचे गौतम गंभीरसोबत कोणतेही वाद नाहीत. विराट-रोहित गौतम गंभीरसोबत बोलतात, असं स्पष्टीकरण दिलं आहे. 'बहुतेक वेळा मी तिथे असतो, त्यांच्यामध्ये नेहमी बातचित होते. सोशल मीडियावर अशा बऱ्याच गोष्टी येतात, पण मी त्या पाहत नाही. पण मी जवळून जे पाहत आहे, ते पाहून मला गोष्टी सकारात्मक दिसत आहेत', असं सितांशू कोटक म्हणाले आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-20 नंतर टेस्ट क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. विराट-रोहितच्या टेस्टमधल्या या निवृत्तीला कोच गौतम गंभीर जबाबदार असल्याची टीकाही चाहत्यांनी केली होती. विराट आणि रोहित 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? याबाबतचा सस्पेन्सही निर्माण झाला आहे.
