खरं तर टीम इंडिया जेव्हा मैदाना बाहेर असते तेव्हा प्रचंड कल्ला करते.या संदर्भातले व्हिडिओ देखील समोर आले आहेत.आता असाच एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव हा एका युवा खेळाडूचा बॉडीगार्ड बनला आहे.एअरपोर्टवर चाहत्यांना दूर करण्यासाठी तो बॉर्डी गार्ड बनला आहे.
सूर्या हा संजू सॅमसनसाठी बॉडीगार्ड बनला होता. खरं तर टीम इंडियासोबत सगळी सूरक्षा व्यवस्था असताना देखील सूर्या त्याच्यासाठी बॉडीगार्ड बनला होता. आणि सर्वांनी बाजूला व्हा, दादा येतो, कुणी त्याला त्रास देऊ नका असे सांगत बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता.त्यामुळे काही वेळेसाठी का असेना सूर्या संजूचा बॉडीगार्ड बनला होता.
advertisement
सूर्या पब्लिक प्लेसमध्ये असं का वागला?
तिरूवनंन्तपुरममधील ग्रीनफिल्ड हे संजू सॅमसनचे हे होमग्राऊंड आहे.त्यात त्याची तिकडे इतकी क्रेझ आहे की सामन्याचे सर्व तिकीट विकले गेले आहे.त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी संजू सॅमसनची फॅन फॉलोईंग येण्याची सर्वाधिक शक्यता आहे.यावरून संजूची क्रेझ दिसून येते आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादवने हीच क्रेझ ओळखून संजू सॅमसनला स्पेशल ट्रीटमेंट दिली होती. या संदर्भातला व्हिडिओ बीसीसीआयने प्रसिद्ध केला आहे.
संजूची बॅट तळपणार का?
संजू सॅमसन या मालिकेतील चारही सामन्यात अपयशी ठरला होता. कारण 4 सामन्यात त्याने फक्त 40 धावा केल्या आहेत. संजूने पहिल्या सामन्यात 10, दुसऱ्यात 6 आणि तिसऱ्यात शून्य आणि चौथ्या सामन्यात 24 धावा केल्या होत्या.संजूला टी20 वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून संघात घेतलं आहे.मात्र फलंदाजीत तो फारशी कामगिरी करताना दिसला नाही आहे.आता शेवटचा टी20 सामन्यात तरी फॉर्ममध्ये परततो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
